काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी मोठा धक्का दिला. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड आणि यंग इंडिया यांची 751 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
ED कडून दिल्ली लखनऊ आणि मुंबई येथील मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता एजीएल कंपनीच्या असून याची किंमत 661 कोटी रुपये आहे. तर 90 कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या यंग इंडियाची ही ईडीने जप्ती केली आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची या प्रकरणांमध्ये चौकशी ED कडून करण्यात आली आहे.
काँग्रेसने इडीच्या या कारवाईविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते अभिषेक मनोज सिंघवी म्हणाले की एजीएलच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई ED कडून करण्यात आली असून काही राज्यांमध्ये चालू असलेल्या निवडणुकांमध्ये अटळ असलेला पराभव यावरून लक्ष हटवण्यासाठी हे प्रयत्न आहेत.
दरम्यान ईडी कडून 751 कोटीची मालमत्ता नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत दिल्ली व मुंबईमधील नॅशनल हेराल्ड हाऊस तसेच लखनऊमधल्या नेहरू भवन यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.