पोंझी योजना चालवल्याचा आणि गुंतवणूकदारांची ₹ 100 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ED ने तमिळनाडू, पुडुचेरीमध्ये आणि चेन्नई यासारख्या अनेक ठिकाणी शाखा असलेल्या त्रिची स्थित प्रणव ज्वेलर्सच्या ज्वेलरी चेनच्या शाखांवर छापे टाकले होते. काही कालावधीसाठी या ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर प्रकाश राज होते मात्र त्यांनी यावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
ईडीने 20 नोव्हेंबर रोजी प्रणव ज्वेलर्स, तिरुचिरापल्ली येथे छापा टाकला 23.70 लाख रुपये रोख आणि काही सोन्याचे दागिने जप्त केल्याचा दावा केला.
ऑक्टोबरमध्ये प्रणव ज्वेलर्सने चालू केलेले स्टोअर बंद केले. तामिळनाडूच्या त्रिची येथील आर्थिक गुन्हे शाखेने मालक, माधन यांच्याविरुद्ध तक्रारींच्या आधारे गुन्हा दाखल केला होता. तर मालक आणि त्याच्या पत्नीविरुद्ध लुकआउट नोटीसही या महिन्याच्या सुरुवातीला जारी करण्यात आली होती.
ED ने काल एक निवेदन जारी करत म्हटले आहे की प्रणव ज्वेलर्सने सोने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली उच्च परतावा देण्याचे वचन देत 100 कोटी रुपये गोळा केले होते. मात्र गुंतवणूकदारांना परतावाच मिळाला नाही, तर गुंतवलेली रक्कमही परत दिली गेली नाही.