आजच्या बातम्या ताज्या (Latest Marathi News): सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार तेलंगणा राज्यात जोरदार सुरू आहे. पदयात्रा प्रचार सभा आणि वेगवेगळ्या वाहनांमधून वाहनावरून आपल्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांमध्ये धडपड सुरू आहे. बी आर एस नेत्याचा अशाच एका प्रचार सभेदरम्यान अपघात झाला. त्यांना झालेली दुखापत गंभीर नसली तरी हा व्हिडिओ पाहून धडके नक्की भरेल.
तेलंगाना मध्ये प्रचार सभेला जात असताना बी आर एस चे नेते KTR राव हे टेम्पो ट्रॅव्हलर चे टपावर उभा राहून प्रचार रॅलीमध्ये प्रचार करत होते. त्यांच्यासोबत यावेळी त्या टपावर आणखी पाच-सहा कार्यकर्ते उभे होते. टेम्पोवरच्या छोट्या जागेमध्ये रेलिंगच्या आधारावर हे कार्यकर्ते आणि नेते उभे होते. बस पुढे जात असताना ड्रायव्हरने अचानक ब्रेक दाबला. आणि त्या टपावर उभे असलेल्या लोकांच्या एकदम धक्क्याने रेलिंग तुटून सर्वजण कोसळले. यामध्ये मंत्री असलेले केटीआर राव हे देखील होते. (Marathi Tajya Batmya)
निजामाबाद जिल्ह्यामध्ये आरमोरी येथे आज मंत्री महोदय निवडणूक प्रचार करत होते या प्रचारादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. अचानक रेलिंग तुटल्यामुळे मंत्री केटीआर राव हे जमिनीवर कोसळले त्यामुळे त्यांना मार लागली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र सविस्तर माहिती मिळू शकली नाही.
BRS leader KTR Rao recently fell down from a vehicle during an election rally in Nizamabad, but escaped without any major injuries.
निजामाबाद येथील निवडणूक रॅलीदरम्यान ते वाहनातून खाली पडले, परंतु कोणतीही मोठी दुखापत न होता ते बचावले. ते 30 नोव्हेंबर 2023 रोजी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत होते. त्यांनी विद्यमान आमदार असलेल्या सिरसिल्ला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ते तेलंगणातील सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय नेत्यांपैकी एक मानले जातात.
KTR Rao information in Marathi
-
केटीआर राव(ktr rama rao) हे भारतीय राजकारणी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र आहेत. सध्या ते महापालिका प्रशासन, उद्योग आणि वाणिज्य, आणि तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स आणि नगरविकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत. ते भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे कार्याध्यक्ष देखील आहेत.
#WATCH | Telangana Minister and BRS leader KTR Rao fell down from a vehicle during an election rally in Armoor, Nizamabad district.
— ANI (@ANI) November 9, 2023
More details awaited. pic.twitter.com/FSNREb5bZZ