ज्या पद्धतीने माणसांची घरे असतात त्याच पद्धतीने प्राण्यांची ही घरे असतात काही पशुपक्षी हे स्वतःचे घर स्वतः बांधतात. तर काही पशुपक्ष्यांची घरे नैसर्गिक रित्या बांधलेले असतात किंवा तयार झालेली असतात.
चला तर जाणून घेऊया घर दर्शक शब्द म्हणजेच प्राणी आणि त्यांच्या घराला काय म्हटले जाते ते:

+ घोड्यांचा - तबेला किंवा पागा
+ कोळ्याचे - जाळे
+ कावळ्याचे - घरटे
+ पोपटाचा - पिंजरा किंवा ढोली
+ मधमाशांचे - पोळे
+ मुंग्यांचे किंवा सापाचे - वारूळ
+ सिंहाची - गुहा
+ घुबडाची - ढोली
+ हत्तीचा - हत्ती खाना, अंबर खाना किंवा पील खान
+ वाघाची - गुहा
+ माणसाचे- घर
+ पक्ष्याचे - घरटे
+ चिमणीचे - घरटे 
+ गाईचा - गोठा 
+ कोंबडीचे - खुराडे
+ उंदराचे - बीळ

हे आहेत प्राण्यांची घरे आणि त्यांची नावे.