ind vs sa world cup 2023: आज कोलकत्ता येथील ईडन गार्डन्स मैदानावर झालेला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघावर 243 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिकेसोबतचा (ind vs sa today) हा सामना खूप इम्पॉर्टंट होता. याचं कारण म्हणजे या वर्ल्ड कप मध्ये दक्षिण आफ्रिकेने भल्याभल्या संघांन मोठ्या फरकाने हरवत धूळ चारलं होतं. त्यामुळे आज झालेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत(sa vs ind) मॅच भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा होता.
भारतीय संघाने आतापर्यंत सात सामने जिंकले आहेत. त्यामुळे गुणतालिकेमध्ये भारतीय संघाचे 14 गुण झाले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही सात सामने खेळून सहा सामने जिंकत एका सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांचे गुणतालिकेत गुण बारा झाले होते. त्यामुळे आज झालेला सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा होता. (today match ind vs sa)
-
-
कारण हा सामना जर आफ्रिकन संघाने जिंकला असता तर भारतासोबत त्यांची 14 गुणांनी बरोबरी झाली असती. आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा रन रेट जास्त असल्यामुळे भारतापेक्षा ते गुणतालिकेमध्ये वर गेले असते. त्यामुळे भारतासाठी हा सामना महत्त्वाचा होता. या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर आता आणखी दोन गुण भारताच्या पॉइंट टेबल मध्ये वाढले आहेत त्यामुळे आता भारतीय संघाचे 16 गुण झाले आहेत.
गुण तालिकेबाबत आलेल्या अपडेट नुसार हे भारतीय संघासाठी एक मोठी गुड न्यूज आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताला आता धक्का देऊ शकणार नाही.