अभिनेत्री सरिता मेहेंदळे :एक फोटो पोस्ट केला तिने तिच्या डोहाळे जेवणाचा.
अभिनेत्रीने दिली गुडन्यूज भागो मोहन प्यारे'मालिकेतील

अभिनेत्री सरिता मेहेंदळे ही ‘भागो मोहन प्यारे’(bhago mohan pyare)झी मराठी वाहिनीवरील या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली आहे. या मालिकेत सरिता मेहेंदळे हिने भुताची भूमिका साकारली होती. तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना पसंतीस उतरली होती. एक मोठी गुड न्यूज सरिताने तिच्या चाहत्यांना दिले आहे.

लवकरच अभिनेत्री सरिता मेहेंदळे(sarita mehndale)आई होणार आहे.
सरिता मेहेंदळे हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोद्वारे तिने गुड न्यूज दिली आहे. तो फोटो म्हणजे तिच्या डोहळ जेवणाचा फोटो पोस्ट केलेला होता. या फोटोमध्ये सौरभ जोशी आणि सरिता मेहेंदळे हे दोघे आनंदात पाहायला मिळाले.

“आमच्या संपूर्ण प्रवासात लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे”, या फोटोला सरिता मेहेंदळने असे हटके कॅप्शन दिले आहे.कुणीतरी येणार येणार गं, नवीन पाहुणा, कपल गोल्स असे तिने हॅशटॅगही दिले आहे.

कलाविश्वातील अनेक मंडळी तिच्या या गुडन्यूजनंतर तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत.राज हंचनाळे,अभिनेत्री गौतमी देशपांडे, यासारख्या अनेक कलाकारांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिच्या अभिनंदन करताना दिसत आहेत.

अनेक मालिका आणि नाटकात देखील सरिता झळकली आहे. तिने  ‘सरस्वती’, ‘कन्यादान’ यांसारख्या मालिकेत काम केले आहे. ‘अर्धसत्य’ या नाटकात तिनं अमोल कोल्हे यांच्यासोबत तिनं काम केलं होतं.तिला खरी प्रसिद्धी ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेमुळे मिळाली आहे.हडळ मधुवंती मोहनच्या मागे असलेली या मालिकेत तिने पात्र साकारले होते.