ग्रामपंचायत निकाल: आज राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींचा निकाल लागला. सकाळी 9.30 पासून मतमोजणी सुरुवात झाली. राज्यातील काही ग्रामपंचायतींचा बिनविरोध निकाल लागला असला तरी रविवारी 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे.
Grampanchayat Election Result 2023

तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. येथे शिवसेनेला (शिंदे गट) फार मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमधील वेंगुर्ले येथील चार ग्रामपंचायत पैकी तीन ग्रामपंचायतींवर भाजपने आपलं वर्चस्व मिळवला आहे. तर या चार पैकी एका ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटांने वर्चस्व मिळवल आहे. -

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक निकाल मध्ये 0 जागा मिळाल्या आहेत. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

ग्रामपंचायत निकाल 2023: 130 सरपंचांच्या आणि 2, 950 सदस्यपदाच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं होत. त्याचा निकाल आज लागला आहे.