आजच्या बातम्या ताज्या: महाराष्ट्रात अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ढगाळ वातावरण आणि पावसाचा अनुभव होता. मात्र, आता ते कमी झाले असून राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यात प्रभावी झाले आहेत. या थंडीचा फायदा रब्बी हंगामाच्या पिकांना होणार आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि शहर परिसरात पहाटे धुक्याची शक्यता आहे. तापमानात होणारी घट आणि फटाक्यांची आतषबाजीमुळे प्रदूषण वाढला आहे. पुढील आठवडाभर राज्यात निरभ्र वातावरण राहणार आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रात गारटा वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते काही ठिकाणी पाऊस पडला होता मात्र आता ढगाळ वातावरण कमी झाल असून हळूहळू थंडी जाणवू लागली आहे.
जम्मू काश्मीर येथे बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून येणारे प्रदेशात थंड वारे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे लवकरच थंडी पडेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हरभरा गहू या पिकांसाठी हा मोठा दिलासा आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रात थंडी अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.