HSC and SSC Form Fill Last Date extension: दहावी-बारावी परीक्षेसाठी बसणारे खाजगी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा देण्याची सुविधा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. यानुसार विद्यार्थ्यांना अति विलंब शुल्काने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून ही मुदतवाढ सात नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.
येत्या फेब्रुवारी मार्च 2024 परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणी अर्ज करायचा विलंबशुल्काचा दिनांक 15 ऑक्टोंबर पर्यंत होता. तर अतिविलंबशुल्काने ऑनलाइन अर्ज भरायचा तारीख 31 ऑक्टोबर पर्यंत होता. मात्र आता त्यानंतर अति विलंब शुल्काने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.
अति विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन 20 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. हे शुल्क देत नाव नोंदणी अर्ज सादर करू शकणार आहेत. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Link For 10th
SSC:- http://form17.mh-ssc.ac.in
Link for 12th
HSC:- http://form17.mh-hsc.ac.in
वर दिलेल्या लिंक वरून फॉर्म नंबर 17 (17 no form ssc) भरायचा ज्यांना आहे त्यांनी अर्ज करू शकतात अशी माहिती राज्य मंडळाला दिली आहे.
दहावी(10th ssc form) बारावीच्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. ऑफलाइन पद्धतीने कोणाचाही अर्ज स्वीकारला जात नाही. अर्जासोबत छाननीसाठी दिलेली कागदपत्रे माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाकडून दिलेल्या वेळेनंतर परत घेऊन जायची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यायचे आहे.
जे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र होतील त्यांना नाव नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षेचे आवेदन पत्र राज्य मंडळांनी दिलेल्या कालावधीमध्ये परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. अति विलंब शुल्काने नाव नोंदणी करण्यासाठी खाजगी विद्यार्थ्यांना सात नोव्हेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. 7 नोव्हेंबर नंतर कोणत्याही पद्धतीने मदत वाढ मिळणार नाही असे राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी सांगितलेल आहे.