मिशेल मार्श हा अष्टपैलू ऑस्ट्रेलियन खेळाडू असून 2023 विश्वचषकामध्ये चांगल्या पद्धतीने फॉर्म मध्ये होता. मात्र आता आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे कारण मार्च ने त्याच्या काही वैयक्तिक कारणासाठी हा वर्ल्ड कप 2023 सोडून ऑस्ट्रेलियाला परत गेला आहे.(mitchell marsh return) तो पुन्हा खेळायला येईल याबाबत कोणतीही अपडेट मिळत नाहीये कदाचित तो वर्ल्ड कप 2023 ही क्रिकेट स्पर्धा चुकवू शकतो.
मिशेल मार्श का खेळत नाही?(why mitchell marsh is not playing today?)
गोल्फ कार्ट अपघातात दुखापतग्रस्त झालेल्या ग्लेन मॅक्सवेलशिवाय(golf accident glenn maxwell) ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का आहे. मार्शल फलंदाजी मध्ये आणि गोलंदाजी मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये होता त्याने पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावलं होतं आणि महत्त्वाच्या विकेट्स ही घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना तो डेव्हिड वॉर्नर सह सलामीसाठी क्रिकेटच्या ग्राउंड वर येत होता. आणि ऑस्ट्रेलियाला धावांच्या बोर्डवर हे चांगली स्थिरता प्रदान करत होता.(mitchell marsh news)
मिशेल मार्श बद्दल कोणाला घेणार
आमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी 4 नोव्हेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सामना इंग्लंड क्रिकेट संघाशी होणार आहे. मात्र मॅक्सवेल(glenn maxwell) आणि मार्शच्या अनुपस्थितीमध्ये संघामध्ये खूप मोठे बदल करावे लागणार आहेत. (mitchell marsh replacement) या दोघांच्या जागी मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरॉन ग्रीनला आणावे लागेल. तरी यामुळे स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांच्या फलंदाजीच्या क्रमावरही परिणाम होईल.
Australia Vs England World Cup 2023
सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ सहा मॅच पैकी चार जिंकला आहे आणि दोन मॅच मध्ये त्यांना पराभव मिळाला आहे. त्यांचा नेट रन रेट+0.970 इतका असून गुणतालिकेमध्ये त्यांचे 8 पॉईंट आहेत. आणि ते गुण तालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर गत विजेता इंग्लंड या गुण तालिकेत सहा पैकी केवळ एक मॅच जिंकू शकला आहे आणि पाच मॅच त्यांनी पराभव स्वीकारले आहेत तर त्यांचे गुण केवळ दोन असल्यामुळे गुणतालिकेमध्ये ते शेवटच्या क्रमांकावर आहेत.
भारतीय क्रिकेट संघाने सात मॅच मध्ये विजय मिळवला असून त्यांनी सेमी फायनल मधील आपला प्रवेश पक्का केला आहे. आता ऑस्ट्रेलियाला आपले स्थान निश्चित करण्यासाठी किमान आणखी एक सामना जिंकणे आवश्यक आहे. तर इंग्लंड ह्या वर्ल्डकप मधून जवळपास बाहेर पडल्यात जमा आहे.