चला तर जाणून घेऊया अल्ट्रा एज तंत्रज्ञान काय आहे?
क्रिकेट विश्वचषक 2023 चा फायनल रविवार 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान होणार आहे. दुपारी 2 वाजता सुरू हा सामना सुरू होणार असून या सामन्यात वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. क्रिकेट सामन्यामध्ये अनेक प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात असल्याचे तुम्ही पाहिले असेल.
तुम्ही या तंत्रज्ञानाकडे लक्ष दिले नसेल, मात्र या तंत्रज्ञानामुळेच तिसरा पंच आपले निर्णय योग्य घेऊ शकतो. असेच एक महत्वाचे तंत्रज्ञान म्हणजे Ulrta-Edge.
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की थर्ड अंपायर निर्णय घेत असताना विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. यात तुम्हाला एक आलेख दिसतो. जेव्हा चेंडू बॅटला स्पर्श करतो तेव्हा तुम्हाला त्यावर रीडिंग दिसते. अशा प्रकारे अंपायर आपला निर्णय सहज घेऊ शकतात.
What is ultra-edge technology and how is it used in cricket? In marathi
क्रिकेट सामन्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर फार पूर्वीपासून होत असून स्टंपमध्ये कॅमेरा आणि माइकचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतर कॅमेरा अँगल अशी अनेक तंत्रज्ञाने आहेत जी तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. अल्ट्रा टेक तंत्रज्ञान हे देखील स्किनोमीटरची ही प्रगत आवृत्ती आहे, जी एज पाहण्यासाठी वापरली जाते.
ब्रिटिश संगणक शास्त्रज्ञ अॅलन प्लास्केट यांनी स्निकोमीटर तंत्रज्ञान विकसित केले असून हे तंत्रज्ञान पहिल्यांदा 1999 मध्ये UK च्या चॅनल 4 ने वापरले होते. अल्ट्रा एज टेक्नॉलॉजीची चाचणी आणि प्रमाणपत्रानंतर, ICCने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा वापर करण्यास परवानगी दिली. या तंत्रज्ञानाची चाचणी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) अभियंत्यांनी केली आहे. या टेक्नॉलॉजीमध्ये माइक स्टंपच्या मध्यभागी ठेवला जातो. तर खेळपट्टीभोवती बरेच कॅमेरे लावण्यात आले आहेत. चेंडू बॅटला स्पर्श करताच वेगळाच आवाज येतो.
स्टॅम्प मध्ये बसवलेला माइक हा आवाज कॅच करतो आणि ट्रॅकिंग स्क्रीनवर ओळखतो. स्टंपमध्ये बसवलेला माइक बॅटचा आवाज आणि पॅड वरील आवाज यातील फरक ओळखायला मदत करतो. या टेक्नॉलॉजीमुळे चेंडू बॅटला किंवा पॅडला लागला की नाही हे कळते. खेळपट्टीवर बसवलेले कॅमेरे सर्व कोनातून चेंडूवर लक्ष ठेवण्यास मदत करतात.
चुका काय आहेत?
काही वेळा माइक बाहेरील नोईज घेतो. दुसरी एक अडचण म्हणजे ज्यावेळी बॅट खेळपट्टीला स्पर्श करतो त्याच वेळी जर चेंडू देखील बॅटला स्पर्श करतो तेव्हा संभ्रम निर्माण होऊ शकतो. आणखी एक चूक म्हणजे जेव्हा चेंडू खेळाडूच्या शरीराला आणि बॅटला एकाच वेळी स्पर्श करतो.