India vs Australia world cup Umpire
आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ आता अंतिम फेरीत पोहोचला आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर (रविवार) रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर(Nerendra Modi Stadium) होणार असून या अंतिम सामन्याचे पंच आणि सामनाधिकारी यांची सुद्धा नावे पुढे आली आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया(India vs Australia) यांच्यातल्या अंतिम सामन्यामध्ये रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि रिचर्ड कॅटलबरो (इंग्लंड) हे मैदानी पंच म्हणून भूमिका बजावतील. तर थर्ड अंपायरिंगची जबाबदारी वेस्ट इंडिजच्या जोएल विल्सनकडे सोपवण्यात आली आहे. तर ख्रिस गॅफनी (न्यूझीलंड) हे चौथे पंच असतील. सामनाधिकारी झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट असतील.
फायनल सामन्यामध्ये रिचर्ड कॅटलबरोचे अंपायरिंग भारतीय चाहत्यांसाठी चिंतेचा विषय असून मागच्या काही आयसीसी इव्हेंटमध्ये, जेव्हा तो भारताच्या सामन्यांमध्ये पंच बनला होता, तेव्हा टीम इंडियासोबत काहीतरी अप्रिय घडले आहे. केटलबरो हे न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक (2019) उपांत्य फेरीतील आणि T-20 विश्वचषक (2021) सामन्यांमध्ये मैदानावरील पंच होते. या दोन्ही सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला होता.
या वर्षी रिचर्डने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही थर्ड अंपायरची भूमिका बजावली होती. यासह, रिचर्ड कॅटलबरो 2014 टी-20 विश्वचषक, 2015 एकदिवसीय विश्वचषक, 2016 टी-20 विश्वचषक, 2016 आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीत भारतासाठी अशुभ ठरला आहे. 50 वर्षीय केटलबरो अंपायर होण्यापूर्वी क्रिकेटही खेळला होता. केटलबरोने 33 प्रथम श्रेणी आणि 21 लिस्ट-ए सामन्यांमध्ये एकूण 1448 धावा केल्या.
भारत-न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही रिचर्ड इलिंगवर्थ हे पंच होते, तेव्हा भारताने विजय मिळवला होता. रिचर्ड इलिंगवर्थ हे माजी क्रिकेटपटू देखील आहेत. 60 वर्षीय रिचर्ड इलिंगवर्थ यांनी इंग्लंडकडून 9 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले होते. या काळात त्याने 49 विकेट घेतल्या होत्या.1992 च्या विश्वचषकात England संघाचाही भाग होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे विश्वचषक स्पर्धेचे अंतिम दोन संघ आहेत. भारत आतापर्यंतच्या सर्व 10 सामने जिंकून अविरत राहिले आहे. ऑस्ट्रेलिया देखील 10 पैकी 8 सामने जिंकले आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडच्या विरुद्ध पहिला सेमी फायनल सामना खेळला, ज्यामध्ये त्यांनी न्यूझीलंडला 70 धावांनी हरवले. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसरा सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेला ३ गडी राखून हरवले. दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हणून ओळखले जाते.