IND vs NED Match highlights: ICC क्रिकेट विश्वचषक 2023 यात भारतीय संघाने सलग नववा विजय मिळवत दिवाळी साजरी केली आणि आपला विजयरथ चालू ठेवला. बेंगळुरू येथे 12 नोव्हेंबर रोजी रविवारी झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला.
Ind vs Ned cricket world cup 2023 highlights

न्यूझीलंड विरुद्ध आता आपला सेमी फायनलचा सामना भारतीय संघ खेळणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी भारत आणि न्युझीलँड यांच्यात सेमीफायनलचा मुकाबला होणार आहे. हा क्रिकेट सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या भारताच्या क्रिकेट टीम ने 410 धावा केल्या यामध्ये त्यांनी चार विकेट गमावले. भारतीय संघाच्या फलंदाजांनी भारताला भक्कम धावसंख्या देत चमकदार कामगिरी दाखवली. श्रेयस अय्यर व के एल राहुल या दोघांनी शतक केले. शुभमन गिल, 
रोहित शर्मा, विराट कोहली यांनी देखील अर्धशतक झळकवलं. श्रेयस आयरने 10 चौकार आणि 5 षटकार ठोकत 94 चेंडू मध्ये 128 धावा केल्या. तर के एल राहुल ने 11 चौकार आणि चार षटकार ठोकत 64 चेंडू मध्ये 102 धावा केल्या. या दोघांनी मिळून 208 धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी केली

भारतीय संघ मॅच च्या सुरुवातीपासूनच अतिशय स्फोटक रीतीने खेळला. रोहित शर्मा आणि शुभम गिरी यांनी पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी 11.5 ओवर मध्ये केली. तर गिलने 32 चेंडूंमध्ये 51 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने तीन चौकार आणि षटकार मारले आहेत. रोहित ने 54 चेंडू मध्ये आठ चौकार आणि दोन षटकार मारत 61 धावांचे योगदान दिले. विराट कोहली ने देखील आपला दमदार फॉर्म दाखवत 51 धावा केल्या यासाठी त्याने 56 चेंडू वापरले तर पाच चौकार आणि एक षटकार मारला.