मुंबईमधील वानखेडे मैदानावर आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल वर्ल्ड कप 2023 मधील सामना रंगणार आहे. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने ट्विटर व पोस्ट करत वानखेडे मैदानाला आग लावायची धमकी दिली. आणि त्यामध्ये त्यांनी ही पोस्ट मुंबई पोलिसांना टॅग केली आहे.
पोलिसांनी वानखडे मैदानाच्या बंदोबस्तामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने गन, हॅन्डग्रेनेड, काडतुस आणि आग लावू अशी धमकी देणारा फोटो यादरम्यान शेअर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी एका 17 वर्षी युवकास लातूर या ठिकाणावरून अटक करण्यात आल्याची वृत्त मिळत आहे. मुंबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अस सेमी फायनल सामना रंगणार आहे. पोलिसांनी वानखडे मैदानाच्या बंदोबस्तात वाढ करून चौकशी सुरू केली होती तपासादरम्यान हा तरुण पोलिसांना सापडला आहे हा विराट कोहलीचा चाहता असल्याचे स्पष्ट होत आहे.