भारतीय संघाने या वर्षीच्या वर्ल्डकप मध्ये आत्तापर्यंत सात सामने जिंकले आहेत. गुणतालिकेमध्ये भारत आपलं स्थान राखला आहे तो या तालिकेमध्ये अव्वल आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय संघाची पारंपारिक विरोधक असलेली पाकिस्तानची टीम या वर्ल्डकप मध्ये अडखळत खेळत आहे. काल झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध डकवर्त लुईस च्या नियमाने विजय मिळवला सेमी फायनल मध्ये पोहोचण्याच्या अशा त्यामुळे पाकिस्तानच्या कायम राहिले आहेत.
या वर्ल्डकप मध्ये पाकिस्तान सुरुवात नेदरलँड आणि श्रीलंका या दोन्ही संघावर विजय मिळवत केली होती. पण त्यानंतर भारतानं त्यांना पराभवची धूळ चारली तेव्हापासून पाकिस्तान उभारू शकला नाही ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका या सर्वांकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाला आता पाकिस्तानला परतावं लागतं की काय अशा चर्चा चालू होत्या मात्र त्याने न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघांना पराभूत केलं आणि सेमी फायनल च्या शर्यतीमध्ये आम्ही अजूनही असल्याचं दाखवून दिलं.
-
-
असं घडलं तर पाकिस्तान होणार सेमी फायनल साठी क्वालिफाय
इंग्लंडवर पाकिस्तानला खूप मोठ्या फरकाने विजय मिळवून गुणतालिकेत दहा गुणांची कमाई करावी लागेल. त्यासोबत अफगाणिस्ताच्या संघाला त्यांचे पुढील दोन सामने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत पराभव स्वीकारावा लागेल यामुळे ते त्यांचे गुण केवळ आठ राहतील.
तर दुसऱ्या बाजूला भारत आणि इंग्लंड या संघाने विरुद्ध नेदरलँडला पराभूत व्हावं लागेल त्यामुळे त्यांचे देखील गुण आठच राहतील.