भारतीय संघाने आपले उपांत्य फेरीतल स्थान आता पक्क केलय. श्रीलंकेला मोठ्या फरकाने हरवत 14 गुण मिळवत सेमी फायनल मध्ये स्थान मिळवल्यानंतर रविवारी 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिके विरुद्ध भारत खेळणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (india vs south africa match) हा सामना ईडन गार्डन कोलकत्ता येथे होणार आहे. टीम इंडिया आतापर्यंत एक ही मॅच गमावली नाही त्यामुळे ही मॅच ही जिंकून आपलं अपराजित राहण्याचे स्वप्न साकारण्याचं लक्ष्य आहे. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका एक मॅच हरल्यानंतर तिथून दमदार कामगिरी केली आहे. सात पैकी सहा सामने जिंकत दक्षिण आफ्रिका गुणतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. नेदरलँडच्या संघाने त्यांचा पराभव केलेला आहे.
जर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (cricket world cup india vs south africa) मॅच जिंकली तर गुणतालिकेमध्ये आपलं पहिलं स्थान कायम राखत आपला स्थान भक्कम करणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या मॅच नंतर डायरेक्ट 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँडच्या संघाशी टीम इंडियाचा सामना होणार आहे. टीम इंडियाला यावेळी एक सुद्धा सामना गमवायचा नाही आणि वर्ल्ड कप सुद्धा जिंकायचा आहे. 2007 या वर्षी झालेल्या विश्वचषकामध्ये ऑस्ट्रेलियन संघानं एक सुद्धा सामना हरला नव्हता जर भारत असं करू शकला तर हा एक विक्रम भारताच्या नावे असणार आहे.
भारत बनाम दक्षिण आफ्रिका हा सामना कोलकत्ता येथील ईडन गार्डन्स वर भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. भारताचा संघ अजून एक ही सामना गमावला नाही त्यामुळे तो विजयी रथावर स्वार झालेला आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका देखील आपला फॉर्म उत्कृष्टपणे दाखवत आहे टेम्बा बावुमाच्या दक्षिण आफ्रिका संघाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता केवळ एका विजयाची गरज आहे. चला तर आता जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन कसा असणार आहे?
Playing XI for India and South Africa
रविवार, ५ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (india vs south africa today) यांच्या आगामी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन पुढीलप्रमाणे आहेतः
भारत प्लेइंग 11 : रोहित शर्मा ©, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग 11: टेम्बा बावुमा ©, क्विंटन डी कॉक (wk), रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा.