टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला दुखापत झाल्यापासून संघाला तो नसल्याची उणीव जाणवत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने टीम इंडिया मध्ये श्रीलंके विरुद्ध हार्दिक पांड्या सामील होऊ शकतो असे सांगितले आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघामध्ये मुंबईमध्ये सामील झाला तो प्लेइंग 11 मध्ये खेळेल का? हे देखील पाहणे तेवढेच औत्सुक्याचं असणार आहे.
हार्दिक पांडेच्या घोट्याला बांगलादेश विरुद्ध दुखापत झाली होती. तेव्हापासून तो उपचार घेत आहे आणि दुखापती मधून सावरत आहे. आत्तापर्यंत वर्ल्डकप मध्ये सहा ही सामन्यांमध्ये विजय मिळवलेला असलेल्या टीम इंडियाने मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंके विरुद्ध आता खेळणार आहे. ही भारताची सातवी मॅच असणार आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये भारत आणि श्रीलंका 2011 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये फायनल मध्ये एकमेकांच्या समोर आले होते. त्यामध्ये भारताने श्रीलंकेला हरवलं होतं आणि 2011 चा वर्ल्डकप आपल्या नावे करून घेतला होता.
भारताच्या संघ व्यवस्थापनाने सांगितला आहे की हार्दिक पंड्या बंगलोर येथील एनसीए मध्ये बरा होत आहे आणि मुंबईमध्ये तो संघामध्ये सामील होईल मात्र आता तरी श्रीलंके विरुद्ध तो खेळेल का नाही हे निश्चित सांगता येत नाही मात्र तो संघात सामील होईल अशी अपेक्षा आहे.
हार्दिक पांड्या मैदानात उतरेल का?
हार्दिक पांड्या मुंबई येथे संघामध्ये परत येणे हे भारतासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध या वर्ल्डकप मध्ये गोलंदाजी करत असताना हार्दिक पांडेच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे 22 ऑक्टोंबर रोजी धर्मशाळा येथे न्युझीलँड विरुद्ध झालेल्या क्रिकेट मॅच मध्ये आणि इंग्लंड विरुद्ध 29 ऑक्टोंबर रोजी झालेल्या मॅच मध्ये हार्दिक खेळू शकला नाही. हार्दिकच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा प्लेइंग इलेव्हन मध्ये समावेश केला. हार्दिक पांड्याने वर्ल्डकप 2023 मध्ये खेळत असताना आत्तापर्यंत 11 धावा केले आहेत. तर गोलंदाज म्हणून त्यानं चार सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेतलेले आहेत त्याची सरासरी 22.60 आहे. मात्र दुखापतीमुळे त्याला काही सामन्यांना मुकावे लागले आहे.
विश्वचषक 2023 च्या सेमी फायनल मध्ये भारत कसा प्रवेश मिळू शकतो?
दोन नोव्हेंबर रोजी भारताचा पुढील सामना वानखेडे स्टेडियम मुंबई येथे श्रीलंकेशी होणार आहे. जर भारत श्रीलंके विरुद्ध जिंकला तर विश्वचषकामध्ये भारताचा सातवा विजय होणार आहे.
आणि आयसीसी वर्ल्ड कप मध्ये सेमी फायनल मध्ये आपलं नाव अधिकृतपणे निश्चित करणार आहे. त्यानंतर न्युझीलँड दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ टीम इंडियाच्या 14 गुणांची बरोबरी करू शकतील. जरी टीम इंडियाचे पुढील सामने पावसामुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे रद्द झाले तरी टीम इंडिया उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारच आहे.
श्रीलंके विरुद्ध दोन नोव्हेंबरला मुंबई येथे सामना झाल्यानंतर भारताचा पुढील सामना 5 नोव्हेंबर रोजी कोलकत्ता येथे होणार आहे हा सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध आहे. तर बंगलोर येथे 12 नोव्हेंबर रोजी भारताचा शेवटचा साखळी सामना नेदरलँड क्रिकेट संघासोबत होणार आहे. विश्वचषक 2023 चे सेमी फायनल चे सामने 15 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहे. तर विश्वचषक फायनल सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.