पहिल्या T20I सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले 209 धावांचे आव्हान भारताने पूर्ण करत समाना 2 विकेटने जिंकला.
 यात तर इशान किशनने 39 चेंडूत 58 धावा केल्या. तर कर्णधार सुर्यकुमार यादवने 42 चेंडूत 80 धावांची जबरदस्त खेळी केली. तसेच रिंकूने नाबाद 28 धावांचे योगदान देत भारताला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. तर ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने 2 विकेट घेतल्या. जेसन बेहरेनडॉर्फ आणि मॅथ्यू शॉर्टने प्रत्येकी एक विकेट घेतली.

जोश इंग्लिसने ऑस्ट्रेलियासाठी T20I क्रिकेटच्या इतिहासात संयुक्त-जलद शतक ठोकले असून या 28 वर्षीय इंग्लिसने विशाखापट्टणम येथे पहिल्या T20I मध्ये 47 चेंडूंत 3 आकडी धावानचा टप्पा गाठला. याचं बरोबर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंच याच्या विक्रमासोबत बरोबरी केली, अॅरॉन फिंच याने 2013 मध्ये इंग्लंडविरुद्ध T20I मध्ये 47 चेंडूंत शतक झळकावले होते.

आज विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या T20I सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाने दिलेले 209 धावांचे लक्ष्य पार करत T20I क्रिकेटमधली त्यांच्या सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग केला. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 80 (42) धावा केल्या. भारताचा मागील सर्वोच्च यशस्वी T20I धावांचा पाठलाग 6 डिसेंबर 2019 रोजी करण्यात आला होता, त्यावेळी भारतीय संघासमोर हैदराबादमध्ये वेस्ट इंडिजने 208 धावांचे लक्ष्य ठेवले होते.