आजच्या बातम्या ताज्या: पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषण झालेले आढळून आले आहे. नदीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडल्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित झाल्याचे चित्र दिसत आहे. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त कधी होणार? मोकळा श्वास कधी घेणार? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
इंद्रायणी नदीचे सर्व फेस युक्त पाण्यामुळे बर्फाळ प्रदेशातील नदीप्रमाणे दिसत आहे. लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेलं आळंदी येथील नदी प्रदूषणाने ग्रस्त झाली आहे. वारकरी या नदीमध्ये पवित्र स्नान करतात. मात्र प्रदूषित झालेले या इंद्रायणी नदीमुळे कोणकोणते रोग शरीराला जडतील याची मात्र कल्पना न केलेलीच बरी.(Latest Marathi News)
येथील इंद्रायणी नदी(Indrayani River) प्रदूषणापासून मुक्त व्हावी म्हणून वारकऱ्यांनी अनेकदा उपोषणे आणि आंदोलने देखील केले आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी आळंदी मध्ये येऊन काही महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार असे आश्वासन दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांना या आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप आळंदी (Alandi News) येथील वारकरी करत आहेत.
इंद्रायणी नदीची झालेली दुर्दशा पाहवत नाही. शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन नदी प्रदूषण मुक्त करावी अशी मागणी येथील वारकरी करत आहेत.
इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी साखळी उपोषण करण्यात आले आहे.