गुजरात टायटन्स या संघाला चॅम्पियन बनवण्यात मोठा हात असलेला कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता आहे, तर मुंबई इंडियन्स मध्ये असलेला सध्याचा कर्णधार रोहित शर्मा नवीन जर्सीमध्ये दिसू शकतो.
रोहित शर्मा हा IPL मध्ये सर्वात यशस्वी कर्णधार असून मुंबई इंडियन्ससोबत 10 वर्षापेक्षा अधिक काळ जोडला गेला आहे. तर या कालावधीत मुंबई इंडियन्स संघास पाच वेळा विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा मोठा हात आहे. सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार देखील आहे. त्यामुळे मुंबई संघ त्याला सहज जाऊ देईल याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्याने GT चे नेतृत्व करत पहिल्याच सत्रात संघाला चॅम्पियन बनवले होते.
हार्दिक पांड्याचे मुंबईच्या संघासोबत देखील खास नाते असून पांड्याला मुंबईच्या संघाने 10 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये विकत घेतले होते तेव्हापासून पांड्या ने मुंबई संघातूनच आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
.
2016 मध्ये बरीच वर्षे चांगल्या कामगिरीनंतर टीम इंडियात त्याची निवड करण्यात आली होती.
न्यूज 18 ने दिलेल्या बातमीनुसार, गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार असलेल्या हार्दिक पंड्या पुन्हा स्वगृही म्हणजेच मुंबई इंडियन्समध्ये परतेल अशी दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा गुजरात टायटन्समध्ये सामील होणार असल्याची बातमी देखील समोर येत आहे.