जेईई मेन (JEE Mains 2024 ) परीक्षेचा अभ्यासक्रम नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जाहीर केला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याबाबत ऑनलाईन अधिकृत नोटिफिकेशन देखील जारी केल आहे. (JEE Mains 2024 Syllabus) एनटीएने यावेळी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केला आहे. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एनटीए(national testing agency) ने एनसीईआरटी च्या अभ्यासक्रमाशी संलग्नित करता यावे म्हणून अभ्यासक्रमांमधून काही टॉपिक्स वगळले आहेत. 

jee main form filling date 2024

रसायनशास्त्रातून हटवलेले टॉपिक्स


jee main reduced syllabus 2024 pdf: रसायन शास्त्रामधील बरेच टॉपिक्स काढून टाकण्यात आले आहेत. भौतिक शास्त्रातील देखील अनेक टॉपिक्स हटवण्यात आले आहेत. प्रायोगिक कौशल्या मधून काही टॉपिक्स काढून टाकण्यात आले आहेत.

रसायनशास्त्र


- पर्यावरण रसायनशास्त्र (Environmental Chemistry)
- पॉलीमर्स (Polymers)
- केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ (Chemistry in Everyday Life)
- जनरल प्रिन्सिपल्स अँड प्रोसेसेस ऑफ आयसोलेशन ऑफ मेटल्स (General Principles and Processes of Isolation of Metals)
- थॉमसन अॅड रदरफोर्ड अॅटॉमिक मॉडल्स अॅड देयर लिमिटेशन्स (Thomson and Rutherford's atomic models and their limitations)
- स्टेटस ऑफ मॅटर (States of Matter)
- सरफेस केमिस्ट्री (Surface Chemistry)
- एस- ब्लॉक एलेमेंट्स (s-Block Elements)
- हायड्रोजन (Hydrogen)
- भौतिक प्रमाण आणि रसायनशास्त्रातील त्यांची मोजमापे आणि अचूकता महत्त्वपूर्ण आकडे -

गणितामधून हटवलेले विषय


- मॅथमेटिकल इंडक्शन्स (Mathematical Reasoning)
- मॅथमेटिकल रीजनिंग (Mathematical Inductions) 

थ्री डायमेंशनल ज्योमेट्री (Three Dimensional Geometry) यातून ही काही विषयही हटवण्यात आले आहेत.

परीक्षा तारीख किती आहे?


jee mains 2024 exam date january session: JEE Mains सेशन 1 इंटरनल परीक्षेला बसण्यासाठी आपण 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकता. तर ही परीक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी यांच्या दरम्यान होणार आहे. सेशन 2 ची परीक्षा 1 एप्रिल पासून चालू होऊन 15 एप्रिल 2024 पर्यंत होणार आहे. तर परीक्षा शहरे कोणती येतील याची माहिती जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यामध्ये देण्यात येणार आहे.(jeemain-nta-nic-in 2024) जेइई मेन्स एक्झाम च्या अगोदर तीन दिवस एडमिट कार्ड(jee main admit card) जारी करण्यात येणार आहेत.

(JEE Mains 2024 Exam Dates)

या परीक्षेचा अर्ज फॉर्म कोणाला भरायचा असेल तर जेइई मेन्स परीक्षेच्या अधिकृत वेबसाईट jeemain.ntaonline.in यावर भेट द्यावी. 

JEE MAIN .NTA.NIC.IN REGISTRATION FORM



JEE परीक्षा काय आहे?


JEE Main, संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यसाठी शॉर्ट फॉर्म आहे, ही भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NITs) यासह विविध प्रतिष्ठित संस्थांमधील पदवीपूर्व अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी भारतातील एक अत्यंत स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा आहे. हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मूल्यांकन करते.