Teaser Jhimma 2: प्रेक्षकांना झिम्मा टू या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. 24 नोव्हेंबर रोजी दिग्दर्शिक हेमंत ढोमे हे या सिनेमाला चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी झिम्माची गॅंग पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.
झिम्मा २ या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे हे आहेत. या चित्रपटाची चर्चा सर्वत्र चालू असून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. युनियन साठी 'झिम्मा'ची गॅंग पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या टिझरमधून पुन्हा एकदा सात जणींच्या सात तऱ्हा आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
आणखी दोन मैत्रिणी 'झिम्मा २'च्या ताफ्यात सहभागी झाल्या आहेत. झिम्मा चित्रपटासारखे यावेळीही इंद्रधनुष्याचे सात रंग हे वेगवेगळ्या सात रंगाने बरसणार आहेत. झिम्मा चित्रपटामध्ये नवीनच मैत्री झाली होती तेव्हा ती मैत्री हळूहळू बहरत गेली. आता नवीनच मैत्री झालेली झिम्मा २ या चित्रपटांमध्ये अधिकच परिपक्व झालेला दिसत आहे.झिम्मा २ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक पर्वणी म्हणून ठरणार आहे.'झिम्मा २' हा चित्रपट आनंद एल. राय प्रस्तुत आणि जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित. हा सिनेमा चित्रपटगृहात 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
झिम्मा या सिनेमातील निर्मिती सावंत ,सायली संजीव, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर ,सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिति जोक हे कलाकार आहेत. आता या कलाकारांसोबत शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू या दोघी नव्याने 'झिम्मा २' या सिनेमात दाखल झाले आहेत.
प्रेक्षकांनी झिम्मा मधील सात मैत्रिणींना आपलंसं केलं होतं. 'झिम्मा' ही सिनेमा बॉक्स ऑफिस वर चाहत्यांचं मन जिंकलं होतं. झिम्मा सिनेमाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. झिम्मा या सिनेमाने आयुष्यातील काही क्षण स्वतःसाठी किती आवश्यक आहेत त्याची जाणीव करून दिली होती. या चित्रपटाने 'स्वत्त्व' आपल्याला शोधायला लावणारा होता. या चित्रपटातील कलाकार पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहेत. मस्ती, मज्जा, धमाल ,जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा आणि मनोरंजनांचा फंडा नव्याने अनुभवायला सांगणारा हा सिनेमा आहे.
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत डोमेने या सिनेमाबद्दल बोलताना सांगितले की 'झिम्मा' या चित्रपटाला लहान बुद्ध आणि तरुण या वयोगटातील प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला होता.'झिम्मा' सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले. ज्या महिला कधीही आपल्या कुटुंबाशिवाय बाहेर फिरली नव्हतीत त्यांनी जेव्हा पाहून आपल्या मैत्रिणीच्या सोबत बाहेर फिरायला जाण्याच आयोजन केले.
प्रेक्षकांना झिम्मा हा सिनेमा आवडल्यामुळे त्या प्रेक्षकांनी मेसेज द्वारे आणि प्रत्यक्ष आम्हाला भेटून 'झिम्मा २' हा चित्रपट यावा अशी मागणी केली होती. 'झिम्मा २' साठी आम्ही त्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच प्रेरित झालो. म्हणूनच आम्ही 'झिम्मा २' या सिनेमाची चांगली कथा तयार करू शकलो. एखादा प्रवास करत असताना आपण बरेच मित्र बनवतो जे कधी आपल्याला रोज भेटणार नाहीत पण मागच्या वेळी जिथे आपण थांबलेलो तिथूनच पुन्हा सुरू होतात! याच आधारित आमच्या या कल्पनेवर इंडियन दुपटीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमेने यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे.
प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत, पण मागच्या खेपेला जिथे थांबलं होतं तिथून पुन्हा सुरू होतात! याच कल्पनेवर आधारित ही ‘रियुनियन’ दुपटीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणार, हे नक्की, असा विश्वास हेमंत ढोमेने व्यक्त केला आहे.