साखरपुडा मोडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे बातमी समोर येत आहे. कानपूरमध्ये 23 वर्षीय तरूणाचा साखरपुडा मोडल्याने धक्का बसून मृत्यू झाला आहे. यासाठी वराच्या मंडळींनी वधूपक्षास जबाबदार धरलं आहे.

वधू पक्षाने मुलाकडून पैसे उकळून त्रास दिला असल्याची ही माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. काकडेदेव पोलीस ठाण्याचे प्रभारी मानवेंद्र सिंग यांनी याबाबत माहिती देत तरूणाचं पार्थिव पोस्ट मार्टम करण्यासाठी पाठवण्यात आलेल आहे आणि अहवाल आल्यानंतर  पुढील तपास सुरू करू असे सांगितले. 

साखरपुडा होणाऱ्या तरुणाचे नाव प्रेम बाबू असून त्याचा विवाह 29 नोव्हेंबर रोजी होणार होता. 18 नोव्हेंबर रोजी तो होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला गेला असता त्यांच्यात वाद झाल्याने तिने लग्नास नकार दिला. त्यामुळे रविवारी तरुणाची प्रकृती बिघडली. कानपूर येथे लाला लजपत राय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचे निधन झाले.