खिन्न समानार्थी शब्द मराठी | Synonyms of khinna in Marathi

khinna meaning in Marathi: खिन्न या शब्दाचा मराठी अर्थ उद्वेग पावलेला असा होतो. त्याचा दुसरा अर्थ एखाद्या गोष्टीतून मन उडालेला व्यक्ती असा देखील होतो. याचा वाक्यात उपयोग करत असताना आपण असा करू शकतो तो स्पर्धेत नंबर न आल्यामुळे खिन्न मनाने बसला होता. याचा अर्थ तो उदास मनाने बसला होता असा होतो. 

Khinna in Marathi

खिन्न या मराठी शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत. अस्वस्थ हा शब्द खिन्न या शब्दासाठी मराठीमध्ये समानार्थी शब्द आहे. उदास हा शब्द देखील खिन्न या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. उद्विग्न हा शब्द देखील समानार्थी शब्द म्हणून खिन्न या शब्दासाठी वापरला जातो. बेचेन या शब्दाचा समानार्थी शब्द खिन्न असा होतो. खिन्न या शब्दासाठी विमनस्क हा शब्द देखील वापरला जातो. विषण्ण हा शब्द देखील खिन्न या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. उदासीन हा शब्द देखील खिन्न या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरण्यात येतो. निराश हा शब्द समानार्थी शब्द म्हणून खिन्न या शब्दासाठी वापरण्यात येतो. खिन्न या शब्दासाठी हताश असा देखील शब्द मराठी भाषेमध्ये आहे.