कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून कुणबी नोंदी (Kunabi Nond) शोधण्यासाठी जोरदार मोहीम चालू आहे. 5,566 नोंदी या मोहिमे अंतर्गत सापडले आहेत. कागल आणि करवीर या तालुक्यामध्ये सर्वाधिक नोंदी आढळले आहेत. हजारच्या वर नोंदी सुरुवातीस सापडल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यापेक्षा जास्त नोंदी आढळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष
कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मागील तीन दिवसांपासून कोल्हापुरातील सर्व तहसील कार्यालयांसह पुरालेखागार कार्यालय आणि कळंबा कारागृहातील नोंदवही मध्ये नोंदी शोधताना कुणबी नोंदी सापडले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष कक्ष स्थापन करत कोल्हापूर जिल्ह्यामधल्या मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणबी या नोंदी(kunbi maratha nondi) तपासण्यात येत आहेत. तालुकास्तरीय समित्यांची स्थापना उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी दिलेली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली हे या कक्षाचे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
कुणबी नोंदीचा शोध तलाठी, कोतवाल, अन्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ऑपरेटर यांच्या सोबत जेलचे पोलिस कर्मचारी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे कर्मचारी, अंशकालीन कर्मचारी असे वेगवेगळ्या गटातील सर्व कर्मचारी घेत आहेत. सर्व रेकॉर्ड त्यासाठी तपासून पाहत आहेत.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नोंदी तपासण्याचे काम जलद करण्याचे आदेश दिले असून तपासलेल्या अभिलेख्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांचे अधिकारी, तहसीलदार व प्रांताधिकारी यांना दिले आहेत. कुणबी नोंदी शोधण्याचे मराठवाड्यात राबवण्यात आलेली मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्त यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा कार्यालयामध्ये वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
मराठी बातम्या ताज्या: जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले मराठवाड्यामध्ये तपासण्यात आलेल्या नोंदीच्या धरतीवर कुणबी नोंदी तपासण्याचे काम जलद राबवा. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यानी समन्वयाने हे काम जलद पूर्ण करावे. कुणबी नोंदी (Kolhapur Kunbi Nondi) असलेल्या अभिलेखांचे यासोबतच मोडी आणि उर्दू लिपीत असलेल्या अभिलेखांचे भाषांतर करत डिजिटलायझेशन करून संवर्धन करावे. हे करण्याकरता पुराभिलेखागार कार्यालय आणि शिवाजी विद्यापीठ भाषा विभाग यांच्या माध्यमातून अधिकृत मोडी लिपी भाषिक आणि वाचीक यांची मदत घ्या अशाही सूचना त्यांच्याकडून देण्यात आले आहेत.