मराठी बातम्या ताज्या: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी दोन नोव्हेंबर 2023 रोजी सरकारच्या प्रतिनिधींसोबत तब्बल सहा तासांच्या चर्चेनंतर नऊ दिवसाचे उपोषण संपवले. दोन जानेवारीपर्यंत सर्व मराठ्यांना आरक्षण देऊ असं सरकारने आश्वासन दिल आहे. सरकारने दिलेला आश्वासन जर पूर्ण केलं नाही किंवा अपयशी ठरलं तर मुंबईची नाकेबंदी करू असा इशाराही त्यांनी दिला.
मनोज जरांगे उपोषण: सरकारला दिलेली चाळीस दिवसांची मुदत संपल्यानंतर 25 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या त्यांच्या गावामध्ये दुसऱ्यांदा उपोषण सुरू केले होते. हे उपोषण आमरण उपोषण असल्यास त्यांनी सांगितलं होतं सरकार मराठ्यांचा विश्वासात करत असल्याचं त्यांनी आरोप केला होता.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, या दोन महिन्यांमध्ये आपण जंगी तयारी करू आणि आपलं आंदोलन चालूच ठेवू. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारला काम करायचा आहे त्यासाठी त्यांनी तीन आयोग स्थापन केले आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाला यासाठी काम करायचा आहे. त्यासोबत एक सल्लागार समिती मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे त्या समितीलाही त्यांचं काम करायचं आहे. मराठ्यांना टिकणारा आरक्षण देता यावं यासाठी हे सगळं करायचं आहे असं सरकारचं म्हणणं आहे.
मनोज जरांगे पाटील यावेळी पुढे म्हणाले, राज्य सरकार आपल्याकडे वेळ मागत आहे मराठ्यांनी फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा मात्र या 2 महिन्यात काही दगा फटका केला तर यांच्या नाड्या आवळ्याच्या. मी उपोषण मागे घेतल्यानंतर आठ दिवसांमध्ये बरा होईन.
त्यानंतर पुन्हा राज्याचा दौरा करू. गावागावात लोकांना भेटू. दोन महिन्यांनी काय होतंय ते पाहायचं आहे. आपण 35 40 वर्ष वाट पाहिली आहे आता अजून दोन महिने वाट पाहूया. मात्र यांनी काही दगा फटका केला तर यांच्या पूर्ण नाड्या बंद करू मुंबईची नाकेबंदी करू.
पहिल उपोषण हे 29 ऑगस्ट 2023 ला चालू केले होते तर 14 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी पहिलं उपोषण सोडलं होतं त्यावेळी सरकारला 40 दिवसांचा अवधी दिला. (आजचा पेपर मराठी)