सध्या मराठी नाटकाची चर्चा सगळीकडे चालू आहे. नाटकाकडे अनेक कलाकार रंगभूमीच्या ओढीनं वळत आहेत. अभिनेत्री गौतमी देशपांडे दोन मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तर आता अभिनेत्री गौतमी देशपांडे छोट्या पडद्यानंतर रंगभूमीवर चमकणार आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande )जे नाटक करणार आहे त्या नाटकाचे नाव 'गालीब'(galib)आहे. लेखक आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरांचं हे नाटक लवकरच रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
गौतमी देशपांडे ही सलग दोन मालिका केल्यानंतर एका चांगल्या नाटकाचा शोध करत होती. गौतमी देशपांडे म्हणते की नाटकापासूनच प्रत्येक नटाची सुरुवात होते. गौतमी देशपांडे ही नाटकाच्या शोधात असताना आव्हानात्मक वाटेल अशी आणि स्वतःला आवडेल अशी भूमिका मिळेल याचा प्रयत्न करत होती. अभिनेत्री गौतमी देशपांडे नाटकाच्या शोधात असताना तिने स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केला होता. चिन्मय मांडलेकर यांनी गौतमी देशपांडे हिला नाटकाबद्दल स्वतःहून विचारणा केली होती. गौतमी देशपांडे हिने नाटकाचे नाव ऐकताच पटकन होकार दिला. नंतर तिला असे कळले की तिचा मित्र विराज सुद्धा या नाटकात तिच्याबरोबर काम करणार आहे.
गौतमी आणि विराज ची जोडी टीव्ही मालिकेतून चमकलेली होती. ही जोडी पुन्हा एकदा योगायोगाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाबद्दल गौतमी म्हणते की नाटकाच्या नावावर जाऊ नका. हें फार वेगळं नाटक असून पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करण्याची संधी या नाटकाच्या निमित्ताने मिळते. ही संधी मिळाल्याबद्दल मला याचा फार आनंद आहे. अनेक कलाकारांची आणि माझी सुरुवात नाटकातूनच झाली आहे. मालिका केल्यानंतर माझी धडपड अशी होती की स्क्रीन पासून दूर जाऊन काहीतरी करायचं असं होतं. अभिनेत्री गौतमी देशपांडे हीची नाटकामुळे इच्छा पूर्ण होत आहे. या नाटकाची तयारी जोरात सुरू झाली आहे. लवकरच रंगभूमीवर हे नवीन नाटक शुभारंभ करेल. राहुल रानडे हे नाटकाच्या संगीताची धुरा सांभाळणार आहेत. नाटकाचं नेपथ्य प्रदीप मुळे हे करणार आहेत.
'सारे तुझ्याच साठी'
गौतमीने इंजीनियरिंग शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळासाठी एका मोठ्या कंपनीत नोकरीही केली होती. तिचे मन नोकरीत रमत नाहीये हे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने नोकरी सोडून दिली व या क्षेत्रात यायचं असं ठरवलं. गौतमीची पहिली मालिका 'सारे तुझ्यासाठी'(sare tujach sati) ही होती. या मालिकेतूनच गौतमी देशपांडे ही टीव्ही विश्वास पाऊल ठेवलं होतं.