विराजस कुलकर्णीने बायकोबद्दल मांडलं मत, म्हणाला की “मी जेव्हा ‘माझा होशील ना’ ही मालिका करायचो…”,
'झी मराठी वाहिनी'वरील सुरू असलेली 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका आता प्रत्येकाच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेने झी मराठी पुरस्कार सोहळ्यात चांगलीच बाजी मारली होती. अक्षरा-अधिपतीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनामध्ये अल्पावधीतच पसंती मिळवली आहे.अभिनेत्री शिवानी रांगोळे ही या मालिकेत अक्षर आहे पात्र साकारत आहे.
मराठी मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून शिवानी ओळखली जाते. अभिनेता विराजस कुलकर्णी(virajas Kulkarni )शी अभिनेत्री शिवानी रांगोळी(Shivani Rangoli)हिने खऱ्या आयुष्यात मे २०२२ रोजी लग्न गाठ बांधली. नवरा विराज मी सासुबाई मृणाल कुलकर्णी यांच्याबरोबर चे फोटो शिवानी कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवानी च कौतुक करण्यासाठी पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्याला विराजस आणि मृणाल कुलकर्णीने उपस्थिती लावली होती.
‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मीडियाशी विराजय आणि मृणाल कुलकर्णी यांनी संवाद साधला. त्या रेड कार्पेटवर विराजय आणि मृणालला शिवानी बद्दलचे प्रश्न विचारण्यात आले. "छोट्या पडद्यावरील प्रचंड लोकप्रिय झालेली अक्षरा अधिपतची जोडी आहे. ऑनस्क्रीन शिवानीचे लग्नाची सीन्स पाहताना मनात काही जाणवतं का?” लोकमत फिल्मीच्या मुलाखतीत असा प्रश्न विराजसला विचारण्यात आला.“आम्ही दोघंही मी आणि शिवानी गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो. असे अभिनेता विराज कुलकर्णी म्हणतो. यापुढे देखील तो असा म्हणतो की हा आमचा कामाचा एक भाग आहे त्यामुळे आम्ही दोघांनी अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत एका नाटकांमध्ये तर मीच लिहिलेले नाटक होतं त्यात शिवानी चा मी मानलेला भाऊ होतो.
“मी जेव्हा ‘माझा होशील ना’(maza hoshil na)ही मालिका करायचो तेव्हा तिला काहीच नाही वाटायचं असे विराजस कुलकर्णी म्हणाला, आणि मी ऋषिकेशला (अधिपती) खूप पूर्वीपासून ओळखतोच. मी त्यांची मालिका एक चाहता म्हणून पहिल्या दिवसापासून पाहत आलो आहे. आपली बायको फारच वेगळी आहे हे पटकन कळून येत कारण अक्षरा अधिपती एवढे खरे वाटतात. खरंच ते दोघे खूप चांगले काम करत आहेत."
सर्वोत्कृष्ट लक्षवेधी चेहरा, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी या तीन पुरस्काराने शिवानी रांगोळी ला झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आला आहे. मृणाल कुलकर्णी ची लाडक्या सुनेचे कौतुक करत तीन पुरस्कार मिळाल्यामुळे पोस्ट शेअर केली आहे.