Marathi serial: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ही मालिका 20 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. विविध धाटणीच्या मालिका 'स्टार प्रवाह' वाहिनी वर प्रेक्षित होत असतात. प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच लक्ष्मीच्या पावलांनी ही नवीन मालिका येणार आहे. या मालिकेची सुरुवात 20 नोव्हेंबर पासून होणार आहे. अभिनेत्री इशा केसरकर ही या मालिकेतून पुन्हा पदार्पण करत आहे. अभिनेता अक्षर कोठारी हा सुद्धा ईशा केसरकर सोबत या मालिकेत झळकणार आहे.
अभिनेता अक्षर कोठारी छोटी मालकीण ,बंध रेशमाचे, स्वाभिमान या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांमधून घराघरात पोहोचला होता. पुन्हा एकदा बंध रेशमाचे प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता अक्षर कोठारी येणार आहे. अभिनेता अक्षर कोठारी हा 'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत अद्वैत चांदेकर यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत अक्षर कोठारी म्हणजेच अद्वैत बिझनेस मॅनची भूमिका साकारणार आहे.अद्वैत सोनं, चांदी आणि हिऱ्यांचा बिजनेस वडिलोपार्जित चालत आलेला तो एकटा सांभाळतो. प्रत्येक गोष्ट बिझनेसशी संबंधित असलेली गोष्ट तो खूप प्रामाणिकपणे करतो. हे पात्र असं असणार आहे की तो जी वस्तू पारखून घेईल त्यात एकही चूक शोधूनी सापडणार नाही. असा असलेला हा पात्राचा एक प्रोमो समोर आला आहे.

अभिनेता अक्षर कोठारी अद्वैत चांदेकर त्या भूमिकेवर म्हणाला की, स्टार प्रवाह वाहिनी सोबत माझं जुनं नातं आहे. अक्षर असाही म्हणतो की या स्टार प्रवाहाच्या कुटुंबांचा मी भाग असल्याचा मला खूप आनंद आहे. अक्षर असेही म्हणतो की माझी नवीन मालिका 'लक्ष्मीच्या पावलांनी' दिवाळीच्या धामधुमेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'स्वाभिमान' ही मालिका संपल्यानंतर नवीन काय करायचं असं सातत्याने विचारना येत होती. अभिनेता अक्षर कोठारी म्हणतो की लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतून मला नव पात्र साकारायला मिळत आहे आणि याचा मला खूप आनंद आहे.

 अक्षर कोठारीला ईशा केसरकर बरोबर काम करण्याबद्दल विचारले असताना त्यांनी एक प्रतिक्रिया दिली."ईशा केसरकर सोबत मी पहिल्यांदाच काम करतोय. पहिल्यांदा भेटताक्षणीच आमची छान मैत्री झाली. मी केलेल्या आधीच्या मालिकांना प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळाले आहे. असेच प्रेम माझ्या या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री मला आहे," असे अक्षर कोठारी म्हणतो.