तेजस्विनी पंडितच्या आई आहेत. ठरलं तर मग’मधील पूर्णा आजी “आईची दुखणी-खुपणी…”, 
अभिनेत्री तेजस्विनी पंडित घराघरात लोकप्रिय झाली.
 ‘अगं बाई अरेच्छा’, ‘तू ही रे’ ,‘येरे येरे पैसा’, अशी ही अशी अनेक चित्रपटांमध्ये हिने अभिनेय केला आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित प्रचंड सक्रिय असते. तेजस्विनी पंडित ही अनेकदा राजकीय आणि सामाजिक विषयावर आपलं मत मांडताना दिसते.

‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीत तेजस्विनीने नवरात्र उत्सवानिमित्त हजेरी लावली होती. या मुलाखतीत तेजस्विनी आपल्या आई ज्योती 
चांदेकरांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.तेजस्विनी पंडितची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर या आहेत. सध्या त्या 'ठरलं तर मग' स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका करत आहेत.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आपल्या आई विषयी सांगताना म्हणाली की "आता माझी आई 68 वर्षांची आहे. या वयात माझी आई भरपूर शूटिंग करते याचं मला खूप कौतुक आहे. माझी आई जेव्हा शूटिंगसाठी सेटवर जात असताना तिचा उत्साह पाहून माझ्यासाठी कमाल आणि अत्यंत लाघवी असतो. एवढ्या पॅशेनेटली काम या वयात करणे खरंच खूप मोठी गोष्ट आहे".
  
 तेजस्विनी पंडित आपली आई बद्दल पुढे बोलताना म्हणाली तिची दुखणी खूपणी खूप आहेत. माझ्या आईला भरपूर आरोग्यदायी समस्यांना करावा लागत आहे.तिचं स्पाइनचं ऑपरेशन झालंय,लवकरच गुडघ्यांचं ऑपरेशन होईल. ठरलं तर मग या सेटवर अलीकडेच ती अचानक चक्कर येऊन पडली होती. एवढी आजारी असूनही ती दुसऱ्या दिवशी शूटिंगला गेली. 

मला आईच्या कलेमध्ये जी ताकद आहे ती प्रचंड ऊर्जा देते. मी कधीच तिच्या नावाचा वापर करून या क्षेत्रात आले नाही. मी तिला तुझी शिडी करायची नाहीये असं सांगितलं होतं. ज्योती चांदेकरांची मुलगी म्हणून मला ओळख नको होती. माहेरच्या आडनावाने म्हणजेच चांदेकर नावाने आई प्रसिद्ध असल्यामुळे माझ्यासाठी ते फायद्याचे ठरलं. 

मी माझी ओळख ज्योती चांदेकरांची मुलगी असे कधीच सांगत नाही. तेजस्विनीने आईला आधीच सांगितलं होतं की मी जेव्हा यशस्वी होईल ते माझं यश असेल आणि जेव्हा यशस्वी ठरेल तरी ती जबाबदारी माझी असेल.