लोकप्रिय अभिनेता सौरभ चौघुले हा कोणता मालिकेत पुन्हा एकदा दिसेल हे आपण आज पाहणार आहोत..
'जीव माझा गुंतला' ही मालिका कलर्स मराठी वरील लोकप्रिय मालिका होती. या मालिकेने सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. 'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या आधी 'सुंदर मनामध्ये भरली' या मालिकेने देखील प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. दोन्ही मालिका ऑफ झाल्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये नाराजगी पसरली होती.
जीव माझा गुंतला ही मालिका 21 जून 2019 रोजी सुरू झाली होती. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये अल्पावरील स्थान निर्माण केलं होतं. प्रेक्षकांना या मालिकेमधील अंतरा -मल्हार ची जोडी खूपच आवडली होती. टीआरपी कमी होण्याचं कारण म्हणजे काही महिन्यापूर्वी या मालिकेमध्ये कंटाळवाणी सीन होत असल्यामुळे याचा परिणाम टीआरपी मध्ये झाला. टीआरपी कमी होत असल्यामुळे जीव माझा गुंतला ही मालिका बंद होणार याची चर्चा सुरू झाली. मालिकेचा शेवटचा भाग 16 सप्टेंबरला प्रसारित झाला. या मालिकेमधील मल्हार आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
अभिनेता सौरभ चौगुले म्हणजेच सर्वांचा लाडका मल्हार आता 'सुंदरी' या लोकप्रिय मालिकेत म्हणजे ‘सन मराठी’ वाहिनीवरील चालू असलेली या मालिकेत मल्हार झळकणार आहे. सुंदरी या लोकप्रिय मालिकेत मल्हार एका महत्त्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर आता प्रेक्षक देखील सौरभ ला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
'सन मराठी' या वाहिनीवरील ‘सुंदरी’ मालिकेचा नवा प्रवास सुरू झाला आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम वनिता खरात ‘सुंदरी’ मालिकेत सौरभ बरोबर झळकणार आहे. 'सन मराठी'च्या सोशल मीडिया पेजवर याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या मालिकेत वनिता खरात हिचा डॅशिंग अवतार दिसत आहे.