'नवा गडी नवं राज्य'. ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर गाजत आहे. आज लोकप्रिय मालिकेच्या यादीत काही महिन्यापूर्वी सुरू झालेल्या 'नवा गडी नवं राज्य'. या मालिकेचा समावेश केला जातो.
प्रेक्षकांना या मालिकेची वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्याची उत्सुकता असते. अनेक रंजक वळण या मालिकेत सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिची या मालिकेत पुन्हा रमाची एन्ट्री झाली आहे.अभिनेत्री अनिता दाते-केळकर तिच्यासाठी अभिनेत्री कीर्ती पेंढारकर हिने खास पोस्ट शेअर केली आहे.
या मालिकेत आनंदीच्या नणंदेची म्हणजेच वर्षाची भूमिका किर्तीने साकारली आहे.सोशल मीडियावर किर्ती सक्रीय असून काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट अनिताच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली.किर्तीने अनिता दाते-केळकर हिचा सोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.
अभिनेत्री कीर्ती पेंढारकर हिने "Happy Birthday अनिता.. असे लिहिले. यादी तिने आणखी एक पोस्ट टाकली होती. अनिता दाते बद्दल कीर्ती पेंढारकर म्हणते ती परत आली आहे आता खूप मज्जा येणार. अनिता दाते परत आल्यामुळे सिरीयल मध्ये तर मज्जा येणारच आहे. पण अनिता सोबत असल्यावर आम्हाला सुद्धा खूप मजा येते. अनिताचा sense of humour कमाल आहे असे कीर्ती म्हणते.
अनिता दाते बद्दल कीर्ती असेही म्हणते की तुझं कामावरच असलेलं प्रेम आणि त्यासाठी लागणारे निर्णय तू अगदी विचार करून घेतेस. तू कायम हसवत राहतेस आणि तू पण अशीच हसत रहा. कीर्तीने आणि त्याला म्हणले "तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत", आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत अशी पोस्ट शेअर केली.