मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केल्याचे वृत्त आहे. 
Bachchu Kadu On Maratha Reservation

आज त्यांनी सर्वपक्षीय बैठकीस हजेरी लावली आहे. तेथे मराठा व कुणबी हे एकच आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, असे बच्चू कडू यांनी म्हटल्याचे वृत्त मिळत आहे. तर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. सध्या नोंदी आढळलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत.

बच्चू कडू हे महाराष्ट्रातील प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी केली आहे. शिवरायांची आई जिजाबाई यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा येथे ६ नोव्हेंबर रोजी रक्तदान करून आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सरकार लवकरच मराठ्यांना आरक्षण देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.