Mongoes in Market: शनिवारी दिवाळीच्या मुहूर्तावर आफ्रिका मधल्या मलावी येथील हापूस आंबे घाऊक बाजारामध्ये उपलब्ध झाले आहेत. बाजारात शनिवारी आंब्यांचा सुवास दरवळत होता. कोकणातील आंबा अजून बाजारात आला नाही मात्र आफ्रिकेतील मलावी हापूस आंब्याने बाजारात चांगलीच बाजी मारली आहे.
First Lot Of Malawi Mangoes

ऑनलाइन मिळालेल्या माहितीनुसार, 600 परदेशी आंब्याचे खोके, फळबाजारामध्ये आले होते प्रत्येक खोक्यामध्ये प्रतवारीनुसार 10, 12, 14, 16 अशाप्रकारे आंबे आहेत. आंब्याच्या खोक्याला चार हजार पाचशे ते पाच हजार पाचशे रुपयांचा दर मिळालेला असून येथील संचालक संजय पानसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आंबे दाखल झाल्या झाल्या विकले गेले आहेत, अशी माहिती मिळत आहे.

 दरवर्षी परदेशी आंबे त्यांच्याकडे बाजारामध्ये येतात यावर्षी कोकणा मधल्या हापूस आंब्यांना बाजारात यायला उशीर होणार आहे. मात्र त्या अगोदरच मलावी आंबे आले असून हे कोकणाच्या सारखेच दिसतात त्यामुळे या आंब्यांना चांगलाच दर मिळतो.

कोकण मधील हापूस आंब्याची रोपे मलावी येथे नेऊन लागवड करण्यात आली आहे. मलावीतील हवामान पोषक असल्यामुळे कोकणे हापूस सारखे दिसायला सेम हे आंबे आहेत. त्यामुळे देशातील बाजारामध्ये या आंब्यांना चांगला दर मिळतो. 20 डिसेंबर पर्यंत या आंब्याचा हंगाम चालणार असून आंब्यांची चव तोपर्यंत चाकता येणार आहे अशी माहिती पानसरे यांनी दिली. दराच्या बाबतीत आंबे खूप महाग असल्याने सर्वसामान्य नागरिक याची मागणी जास्त करत नाहीत मात्र कार्पोरेट क्षेत्रामध्ये या आंब्यांना मागणी असून दिवाळीत भेट म्हणून देण्यासाठी हा आंबा चांगला पर्याय ठरला आहे.