मृतदेह समानार्थी शब्द मराठी | Synonyms of Mrutdeh in Marathi

मृतदेह हा शब्द मराठी भाषेत वापरला जातो. मृतदेह या मराठी शब्दाचा अर्थ निर्जीव शरीर किंवा ज्या शरीरामध्ये जीव नाही असा होतो. एखादी व्यक्ती मृत्यू पावली किंवा वारली म्हणजेच त्याच्या शरीरातून प्राण निघून गेले तर त्याच्या शरीराला मृतदेह असं म्हटलं जातं. 

मृतदेह या मराठी शब्दाला अनेक समानार्थी शब्द आहेत. पार्थिव हा शब्द मृतदेह या शब्दाला समानार्थी शब्द आहे. मृतदेह या शब्दाला प्रेत असाही समानार्थी शब्द आहे. मुडदा किंवा मुरदा हा शब्द देखील समानार्थी शब्द मृतदेह यासाठी आहे. मढे हा शब्द जास्त करून ग्रामीण भागात मृतदेहासाठी वापरला जातो तो देखील मृतदेह या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. शव हा शब्द देखील मृतदेह या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो.