Naal 2 Marathi Movie Official Trailer Nagraj Manjule Director : प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा नाळ हा चित्रपट गाजला होता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला.
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा नाळ हा चित्रपट गाजला होता. त्या चित्रपटाला मिळेल प्रेक्षकांचा प्रतिसाद ही मोठा मिळाला होता.चाहत्यांना, प्रेक्षकांना गेल्या काही दिवसांपासून त्याच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता लागलेली होती. प्रेक्षकांच्या भेटीला आता त्यांचा ट्रेलर भेटला आहे.सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अभूतपूर्व यश देखील प्राप्त केले. या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर देखील नाव कोरले. प्रेक्षकांच्या मनात त्या इवल्याच्या गोड 'चैतू'ने घर केले. या चित्रपटाची कथा एका अशा वळणावर येऊन थांबले जिथे अनेकांना प्रश्न निर्माण झाले.'नाळ भाग २' या चित्रपटांमध्ये तेव्हा न घडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
'नाळ भाग २' दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे नागराज पोपटराव मंजुळे आणि जी स्टुडिओज निर्मिती यांनी केली आहे. तर नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे ट्रेलर झळकले आहे.
श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी हे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.चैतू हा नाळ या चित्रपटामध्ये त्याच्या खऱ्या आईकडे निघालेला असतो. पण तो त्याच्या खरा इकडे पोहोचणार का? ते दोघे एकमेकांशी बोलणार का? अशा या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 'नाळ भाग २' मध्ये पाहायला मिळणार आहे.ट्रेलरही 'नाळ भाग २'चे उत्कंठा वाढवणारे आहे. या चित्रपटाचा टेलर पाहिल्यास आपल्याला कळतंय हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकणार आहे नागराज मंजुळे यांच्या या चित्रपटाचे जिथे चित्रीकरण झालंय ते स्थळ ही एखादी व्यक्तिरेखा साकारत असल्याचं प्रत्येक या चित्रपटातून आपल्यासमोर येत आहे नाळ भाग दोन हा चित्रपट नागराज मंजुळे या चित्रपट यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण भाग असणार आहे.
या चित्रपटातील कलाकार जितक्या ताकतीचे दिसत आहेत तितकेच या चित्रपटातील महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात निसर्ग सौंदर्य म्हणजे दऱ्या, नदी ,घरे, डोंगर असे अतिशय सुरक्षितता टिपण्यात आल्याचे दिसत आहे. या चित्रपटां मधील ट्रेलर मध्ये गोंडस चिमीने प्रेक्षकांचा विशेष लक्ष वेधून घेतले आहे.'नाळ'हा भावनिक, कौटुंबिक चित्रपट जसा होता तसाच 'नाळ भाग २' या चित्रपटांमध्ये देखील चिमीची निरागसता प्रेक्षकांना होणारे आहे.
दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी या चित्रपटाबद्दल म्हणतात की कथा जिथे थांबते तिथूनच 'नाळ भाग 2' ची कथा सुरू होणार आहे. ही कथा नात्यांना जोडणारी, घट्ट बांधणारी आहे.दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणतात, आम्हाला खात्री आहे पुन्हा एकदा या चित्रपटाचे निमित्ताने तुमच्या सोबत आमची नाळ जोडली जाणार आहे. प्रेक्षकांना ट्रेलर पाहून कल्पना आली असेलच त्यामुळे मी प्रेक्षकांना मनापासून सांगतो की हा चित्रपट चित्रपटगृहात आवर्जून पहा.
छोट्याशा गावांमधील छोटीशी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे जी आपल्या मनाला परतून जाते गावाकडची ओढ लावणारी आपल्या गावाच्या प्रेमात पडणारी अशी ह्या चित्रपटाची कथा आहे असे बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणाले. नाळ चित्रपटात लहान असलेल्या चैतू हा आता मोठा झालेला असेल. त्याचीही आता परिपक्व अभिनय दिसेल. सगळ्यात लहान यातील चिमी आहे. सर्वात लहान असून देखील तिने उत्तम अभिनय केला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाचे दिवाळी गिफ्ट हॅम्पर आहे.