'नाळ' (Naal) हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेला होता दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नाळ या चित्रपटातील निरागस आणि छोट्या चेतने सर्वांचे मन जिंकून घेतले होते. 'जाऊ दे नं वं' हे गाणं देखील या चित्रपटातील सुपरहिट ठरलं होतं. या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे बोल आणि संगीत लाभले आहे. तर हे गाणं जयस कुमार यांनी गायलं होतं. या गाण्याची लोकप्रियता इतक्या वर्षानंतरही अजूनही कायम आहे.
'नाळ भाग २' हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटातील गाणी ही आले आहेत. 'नाळ भाग २' या चित्रपटातील 'डराव डराव' आणि 'भिंगोरी' ह्या गाण्यांना प्रचंड सोशल मीडियावर व्ह्यूज मिळत आहेत.
प्रेक्षकांच्या व्ह्यूजमुळे कळत आहे की ही गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 'नाळ' या चित्रपटातील 'जाऊ दे नं वं' हे सुपरहिट गाणं या चित्रपटात देखील ऐकायला आणि पाहायला मिळणार का याची उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल की हे गाणं या चित्रपटात आहे की नाही.
नुकताच पडद्यामागची धमाल 'नाळ भाग २'च्या टीमचा चित्रीकरणदरम्यान व्हिडिओ सुरू असलेला प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओ मध्ये 'जाऊ दे नं वं' हे गाणं पाठीमागे वाजत असलेल्या ऐकू येत आहे.१० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांना कळेल की हे गाणं या चित्रपटांमध्ये असणार आहे की नाही.
'नाळ भाग २' या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी केली आहे. 'नाळ भाग २' या चित्रपटांमध्ये देविका दफ्तरदार,श्रीनिवास पोकळे,दीप्ती देवी,जितेंद्र जोशी,त्रिशा ठोसर,नागराज मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.