Nashik News: नाशिक येथील एमजी रोडवर काल रात्री आग लागवड पाच ते सहा दुकाने जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत चालू होते. मात्र ही आग कशामुळे लागली हे कळू शकलं नाही.
Nashik MG road Market Fire Shop burned

सध्या सर्वत्र दिवाळीची धूमधाम चालू आहे. नाशिक मध्ये ही उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. मात्र नाशिक शहरातील एमजी रोड परिसरात काल रात्री भीषण आग लागली.

एमजी रोडवर असलेल्या रेड क्रॉस सिग्नल जवळ वर्धमान शोरूम हे दुकान आहे या दुकानाला रात्री अकराच्या सुमारास आग लागली. थोड्या वेळातच या आगीने उग्ररूप धारण केले त्यामुळे बाजूला असलेली दुकानांना ही आग लागली यामध्ये बुक डेपो संगीत शाळा यासारखे पाच-सहा दुकाने जळून खाक झाले आहेत.

सर्व दुकानांमध्ये दिवाळीचे साहित्य उपलब्ध असल्याने  कोट्यावधी रुपयाची नुकसान या आगीमध्ये साहित्य जळून झाले असल्याचे बोलले जात आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळताच 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आज भिजवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. फटाक्यांमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे मात्र नेमकं कारण समजू शकलं नाही.