जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

विराटला भिडलेल्या नाविन उल हकने घेतली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती; naveen-ul-haq retirement

naveen-ul-haq retirement: अफगाणिस्तान संघाने वर्ल्डकप 2023 मध्ये भल्या भल्या संघांना दमछाक करायला लावली. मात्र त्यांना सेमी फायनल मध्ये आपलं स्थान मिळवता आलं नाही. आणि वर्ल्ड कप 2023 मधील अफगाणिस्तानचा प्रवास संपला. 
naveen-ul-haq retirement

हा प्रवास संपल्या संपल्या अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक ने एक दिवशी क्रिकेट मधून निवृत्ती घेतले की बातमी येत आहे. त्याने विश्वचषक संपण्यापूर्वी याची घोषणा केली होती. 27 सप्टेंबर रोजी विश्वचषकानंतर एक दिवशी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. -

नवीन उल हकने १० नोव्हेंबर रोजी शुक्रवारी instagram वर पोस्ट लिहित निवृत्तीची पुष्टी केली. मे रहू या ना रहू हे गाणं लावत त्याने काही छायाचित्रे पोस्ट केले आहेत. त्यासोबत कॅप्शनमध्ये त्याने थँक्यू म्हणून लिहिले आहे. सोबत अफगाणिस्तानचे ध्वज असलेली इमोजी देखील जोडली आहे. नवीन ने या पोस्टवर द्वारे यापुढे एक दिवशीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानची जर्सी मध्ये दिसणार नसल्याचे स्पष्ट केल आहे.

नाविनने इन्स्टा स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी लिहिलं मी पहिल्या सामन्या पासून शेवट सामन्यापर्यंत मोठ्या अभिमानाने जर्सी घातली आहे. शुभेच्छा पाठवल्याबद्दल सर्वांचे आभार...

T20 क्रिकेट वर लक्ष केंद्रित करण्यासाठी नवीन ने एक दिवसीय क्रिकेट मधून माघार घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर तो अफगाणिस्तान कडून आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी खेळत राहणार आहे. सप्टेंबर मध्ये त्याच्या भविष्यातील योजनांची सविस्तर माहिती त्यांनी दिली होती. आपली कारकीर्द लांबवायची असून त्याला इतर फॉरमॅट पेक्षा टी ट्वेंटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. 

नवीन उल हक आत्ता 24 वर्षाचा असून(naveen-ul-haq age) त्याने अफगाणिस्तानसाठी 15 एक दिवसीय सामने खेळले आहेत. त्याची इकॉनोमी 6.15 असून 32.18 या सरासरीने त्याने 22 विकेट घेतले आहेत. अंतिम एक दिवशी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध 6.3 षटके नवीन ने टाकले आहेत मात्र या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. 

विराट सोबत झाला होता आयपीएल मध्ये वाद

आयपीएल मध्ये म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग मध्ये विराट कोहली(virat kohli) शी वाद झाल्यानंतर नवीन उल हक चांगलाच चर्चेत आला होता. या दोघांचा झालेला वाद सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर वर्ल्ड कप 2023 मध्ये नवीन ने विराट कोहलीला भेटून झालेल्या वादावर पडदा टाकला होता. विराट कोहलीच्या वागणुकीवरून तो सुद्धा ते भांडण विसरून गेल्याचे दिसून येत होते.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या