निकाल हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. निकाला या शब्दाचा मराठीत अर्थ एकमेकांचे म्हणणे ऐकून एखाद्या विषयावर दिलेल मत असं होतं. निकाल हा शब्द न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वापरला जातो. न्यायालयीन प्रक्रियेत वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकत दिलेल मत. शालेय जीवनात निकाल हा शब्द विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे की नाही हे सांगण्यासाठी केला जातो. निकाल लावणे या शब्दाचा अर्थ शेवट करणे असा होतो.
Nikal Samanarthi Shabd In Marathi
निकाल या मराठी शब्दाचा समानार्थी शब्द निर्णय असा आहे. निवाडा हा शब्द निकाल या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. सोक्षमोक्ष या शब्दाचा अर्थ निकाल असाच होतो. परिणाम हा शब्द देखील निकाला या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. समारोप, शेवट हे शब्द देखील निकाल या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. अखेर, समाप्ती या शब्दांना निकाल हा शब्द समानार्थी आहे.