खेळाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये ICC ने डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीमध्ये होणाऱ्या मेन्स एकदिवसीय आणि T20I क्रिकेटमध्ये चाचणी करण्याच्या आधारावर 'स्टॉप क्लॉक' हा नियम लावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
ICC introduces stop clock to monitor time

अहमदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) बोर्डाची मंगळवारी बैठक झाली. जर गोलंदाजी करणारा संघ मागचा ओव्हर पूर्ण झाल्यावर पुढच्या 1 मिनिटात पुढील ओव्हर टाकण्याला तयार झाला नसेल आणि एका डावात असे तीन वेळा घडले तर पाच धावा दंड म्हणून दुसऱ्या संघाला दिल्या जातील, अशी माहिती आयसीसीने केलेल्या एका रिलीज मध्ये म्हटले आहे.

MCC जागतिक क्रिकेट समितीने सप्टेंबर 2022 मध्ये विशेषत: कसोटी सामन्यांमध्ये खेळास गती देता यावे या उद्देशाने उपाययोजना सुरू करण्यासाठी नियमांचे नूतनीकरण करत असल्याची माहिती मिळाली. या MCC जागतिक क्रिकेट समितीमध्ये भारताचे माजी कर्णधार आणि माजी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली, इतर अनेक माजी माजी क्रिकेटपटूं सदस्य आहेत.

वर्ल्ड कप 2023 मध्ये श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज 'टाइम आऊट' झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनने अपील केल्यानंतर अँजेलो मॅथ्यूजला आऊट देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आऊट मुळे बाद होणार पहिलाच खेळाडू अँजेलो मॅथ्यूज ठरला.