Pandav Panchami 2023 Date: दिवाळी झाल्यावर कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षात पाचवा दिवस म्हणजे पंचमी तिथी या दिवशी पांडव पंचमी साजरा करण्यात येते. पांडवानी भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्याने कौरवांचा या दिवशी पराभव केला होता. याच स्मरण राहावं म्हणून पाच पांडवांची पूजा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती. यावर्षी 2023 मध्ये शनिवारी 18 नोव्हेंबर रोजी पांडव पंचमी साजरा करण्यात येणार आहे. पांडवांसारखे पुत्र मिळावेत म्हणून या दिवशी पांडवानी कृष्ण यांची पूजा केली जाते. ज्ञानपंचमी, लाभपंचमी, कडपंचमी आणि सौभाग्य पंचमी अशा नावाने सुद्धा पांडव पंचमीला ओळखले जाते.
pandav panchami 2023

दुसऱ्या एका कथेनुसार पांडव पंचमीच्या दिवशी पांडवांचा तेरा वर्षांचा वनवास पूर्ण झाल्याची माहिती मिळते. तर काही वेळा स्वर्गरोहणासाठी पांडवांनी प्रस्थान ठेवले तो कार्तिक शुद्ध पंचमीचा दिवस होता म्हणून या दिवशी पांडव पंचमी साजरी करण्यात येते. असे सांगितले जाते. पांडवांना या दिवशी देहाला विराम कधी ना कधी द्यावाच लागतो असे ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून या दिवसाला ज्ञानपंचमी असे देखील म्हटले जात. तर कडपंचमी हे नाव दिवाळीचा उत्सव संपत आला म्हणून दिल आहे.

पांडव पंचमीच्या दिवशी स्त्रिया अंगणामध्ये शेणाचे पाच पांडव बनवून पूजा करतात याच्यामागे लग्न झालेले आणि संतती प्राप्तीची इच्छा असलेल्या स्त्रिया ही पूजा करतात. पांडवांसारखे पुत्र आपल्यालाही लाभू देत अशी यामागे भावना आहे. महाभारतात पांडव आणि कौरव यांच्यामध्ये युद्ध झाले होते. पांडव हे श्रीकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली लढले होते. पांडवांचे संख्याबळ अत्यंत कमी होते तरी देखील बलाढ्य अशा कौरव सेनेचा त्यांनी पराभव केला आणि जगासमोर आदर्श उभा केला. म्हणून या दिवशी पांडवांसारखे गुण आपल्यात यावे अशी इच्छा बाळगून पूजा केली जाते.

गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये हा दिवस दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून उत्साहाने साजरा करण्यात येतो. लाभपंचमी असेही या पंचमीला ओळखलं जातं. हा दिवस शुभ कार्य करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो. जैन धर्मामध्ये हा दिवस ज्ञानपंचमी म्हणून साजरा करण्यात येतो. जैन बांधव मोठ्या उत्साहाने कार्तिक शुद्ध पंचमी हा दिवस साजरा करतात. 

महाराष्ट्रामध्ये हा दिवस पांडव पंचमी म्हणून साजरा करण्यात येतो तर गुजरात मध्ये दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून हा दिवस अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात येतो. गुजराती समाज लाभपंचमी या नावाने पांडव पंचमी साजरा करतो तर श्री गणेश लक्ष्मी यांचे पूजन या दिवशी गुजराती समाजामध्ये केलं जातं. दिवाळी इतकेच महत्त्व या पूजेला ही ते देतात. महाराष्ट्रामध्ये कडपंचमी या नावाने पांडव पंचमीला ओळखलं जातं तर हा दिवाळीतला शेवटचा दिवस म्हणून ते साजरा करतात तर दुकानदार या दिवशी दिवाळी साजरी करण्याला प्राधान्य देतात कारण दिवाळीच्या दिवशी गिर्‍हाईकांची गर्दी दुकानांमध्ये भरपूर असते त्या दिवशी पूजन करायला मिळत नाही म्हणूनच कडपंचमी दिवशी दुकानांमध्ये पूजा केली जाते.