Marathi new movie: मराठी सिनेसृष्टीत विविध धाटणीचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत.प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा चित्रपट येत आहे. नव्या चित्रपटाचे नाव पिल्लू बॅचलर असे आहे. अभिनेत्री अक्षय देवधर(Akshra Devdhar)या चित्रपटातून पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.
विनोदी आणि एक हलकीफुलकी कथा पिल्लू बॅचलर(Pillu Bachelor)या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक या चित्रपटात प्रेम कथा पाहायला मिळेल असा अंदाज या चित्रपटाच्या नावावरून लावत आहेत. तरीही प्रेक्षकांना ही कथा काय आहे व कशाबद्दल आहे याचं कुतूहल आहे.
अक्षया देवधर,पार्थ भालेराव, शशांक शेंडे, सायली संजीव,डॉ. मोहन आगाशे अशी तगडी कलाकार पिल्लू बॅचलर(Pillu Bachelor)या चित्रपटात पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाची निर्मिती अभिजित देशपांडे ,वर्षा पाटील, सुनील फडतरे यांनी केली आहे.
या चित्रपटाची प्रस्तुती श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे येथे करण्यात आली आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केली आहे. हया चित्रपटाची कथा अरविंद जगताप(Arvind Jagtap)यांनी लिहिलेली आहे. तानाजी घाडगे यांनी बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट यापूर्वी दिले आहेत. मंगेश कांगणे यांनी या चित्रपटाचे गीतलेखन केले आहे. संगीत दिग्दर्शन हे चिनार महेश यांनी केली आहे. छायाकन सूर्य मिश्रा यांनी केले आहे. संकलनाची जबाबदारी आनंद कामथ यांनी निभावली आहे.