PM Modi in Indian Cricket Team's Dressing room:
ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा फायनल सामना टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यामध्ये भारताचा सात गडी राखत पराभव केला. आणि क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावल. या पराभवामुळे भारतीयांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण तर राहिलंच सोबत टीम इंडिया मधील खेळाडू यावेळी भाऊक झाले. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंची भेट घेतली. 
Prime Minister Narendra Modi went to the dressing room of Team India and met the players

देशभरातील क्रिकेट प्रेमी भारतीय क्रिकेट टीमच्या क्रिकेट विश्वचषकातील पराभवामुळे निराश झाले. साखळी फेरीमध्ये एक सुद्धा सामना न गमावलेल्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळालं. जर वर्ल्ड कप जिंकले असते तर 2011 नंतर तब्बल बारा वर्षानं भारताला वर्ल्ड कप मिळाल असत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारतीय खेळाडू निराश झाले. आणि ड्रेसिंग रूम कडे परत जाऊ लागले.

तर भारतीय क्रिकेट टीम मधल्या खेळाडूंना धीर देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रूम मध्ये गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन दिले. टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी यांनी एक फोटो ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शमीला धीर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

मोहम्मद शमी पोस्ट लिहित म्हणाला, मी pm मोदी यांचे आभार मानतो. स्पेशली ड्रेसिंग रूम मध्ये ते आले आणि आमचं मनोधैर्य वाढवलं. आम्ही पुन्हा दमदार पुनरागमन करू. असं पोस्ट लिहीत मोहम्मद शमीने विश्वास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे फोटो रवींद्र जडेजा यांनी देखील शेअर केले आहे. तो लिहितो पराभव मुळे निराशा झाली मात्र आम्ही पुनरागमन करू.

दरम्यान काल झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनल सामन्यांमध्ये टीम इंडिया केवळ 241 धावांचं टार्गेट ऑस्ट्रेलियाला देऊ शकलं. ऑस्ट्रेलियाने हे टार्गेट सात विकेट राखत पूर्ण केलं आणि विश्वचषकावर आपलं नाव कोरलेल आहे.