Pune Yerawada: पुण्यातील येरवडा कारागृहातून धक्कादायक घटना समोर येत आहे. या कारागृहातील कुख्यात गुंड पळून गेला असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कारागृह प्रशासनाकडे हा गुंड कधी पळाला याचे उत्तर नाही. तुरुंगातील कैद्यांची मोजणी सोमवारी दुपारी करण्यात आली तेव्हा ही बाब उघडकीस आली आहे. पुणे पोलिस दलात या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 
 escapes from Yerawada jail
पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २००८ मध्ये झालेल्या हत्येप्रकरणी फरार गुंड आशिष जाधव याला पोलिसांनी अटक केली होती. 2008 पासून तो शिक्षा भोगत होता तर त्याची नेमणूक रेशन विभागात काम करण्यासाठी येरवडा कारागृह प्रशासनाने केली होती. हे काम करत असताना तो पळून गेल्याचे पोलिसांना संशय आहे. 

सोमवारी दुपारी अधिकारी कैद्यांची मोजणी करत असताना हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला आहे. आरोपी आशिष हा कुठेच आढळून न आल्याने शोध घेतली असता. इतर कैदी त्याच्या बद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले. 

या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपी जाधव याच्या शोधात पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.