आरोपी आदित्य रणवरे आणि सागर बनसोडे यांना या घटनेनंतर चतुःश्रृंगी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून अधिकाऱ्यांनी 1 जिवंत राऊंड आणि 2 देशी बनावटीचे पिस्तुल जप्त केले असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित नावाच्या आणखी एका व्यक्तीसह आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहतात तर नोकरी मोटार कंपनीत करतात. या हल्ल्यामागे असलेला हेतू रोहितच्या नोकरीच्या गैरसमजातून निर्माण झालेला दिसतो.
या गोळी बारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आकाश बाणेकर असे असून आदित्य रणावरे, सागर बनसोडे यासोबत साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी निलेश पिंपळकर (वय ३८, रा. गुजराथ कॉलनी, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. तरुणावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर त्यातली एक गोळी उजव्या मांडीत लागली आहे. जखमी तरुण स्वतः कासारसाई येथल्या एका रुग्णालयात उपचारांसाठी गेला. चतुशृंगी पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरू आहे.