rbi action on bajaj finance: बजाज फायनान्स ही देशातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) असून या कंपनी  विरोधात रिझर्व्ह बँकेने आता मोठी कठोर कारवाई केली आहे. या कंपनीला रिझर्व्ह बँकेनं कर्ज मंजूर करणे आणि वितरित करणं हे दोन उत्पादनांतर्गत  थांबवण्यास सांगितलं आहे. यात ईकॉम (eCom) आणि इंस्टा ईएमआय कार्ड (Insta EMI Card) या प्रॉडक्टचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
rbi bajaj finance news/ bajaj finance card

रिझर्व्ह बँकेकडून बजाज फायनान्सवर नियमांचं पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली असून ही  फायनान्स कंपनी भारतातील मार्केट कॅपिटलनुसार सर्वात मोठी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे. 

डिजिटल लोन मार्गदर्शक तत्त्वांच्या विद्यमान तरतुदींचं पालन न करणं, मुख्यतः या दोन उत्पादनांतर्गत ग्राहकांना तथ्यांचे मुख्य तपशील जारी न करणं आणि बजाज फायनान्सद्वारे मंजूर अन्य डिजिटल कर्जांच्या संदर्भात जारी केलेल्या तपशीलांतील त्रुटींमुळे ही कारवाई आवश्यक असल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे. कमतरता दूर करण्यात आल्यावर रिझर्व्ह बँकेकडून या निर्बंधांचे पुन्हा अवलोकन करण्यात येईल, असं जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.(rbi news)

bajaj finance share: बजाज फायनान्सचा शेअर बुधवारी 1.84 टक्क्यांच्या घसरणीसह 7,223.95 रुपये वर बंद झाला. बजाज फायनान्स कंपनीचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 5,487.25 रुपये आहे आणि उच्चांकी स्तर  8,190 रुपये आहे. मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी एनबीएफसी बजाज फायनान्स आहे. (bajaj finance news Marathi)