रिंकू नये आपल्या नव्या चित्रपटाचे नाव आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर केले आहे.
   नव्या चित्रपटातील रिंकू राजगुरुचा लूक समोर

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू(Rinku Rajguru)आहे. 'सैराट’ चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा चित्रपटामुळे रिंकू सर्वांच्या घराघरात पोहोचली. आर्ची चे हे पात्र रिंकू ने साकारलेलं चांगलंच गाजलं होत. रिंकू ने मराठी सिनेमा बरोबरच बॉलीवूड मध्ये ही आपली ओळख निर्माण केली आहे.‘झिम्मा २’ या चित्रपटात रिंकू लवकरच झळकणार आहे. ‘झिम्मा २’नंतर आणखी एक चित्रपट रिंकू च्या हाती लागला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रिंकूने आगामी चित्रपटाचे नाव  जाहीर केले आहे.

सोशल मीडियावर रिंकू मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती चाहत्यांना अपडेट देण्यासाठी निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. रिंकू नये आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केले आहे. रिंकू ने या पोस्टमध्ये तिच्या आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. 

रिंकू च्या आगामी चित्रपटाचे नाव 'आशा’ असा आहे. रिंकू ने इंस्टाग्राम वर चित्रपटातील तिचा लुक शेअर केला आहे. रिंकू तिच्या आगामी चित्रपटात तिच्या फोटो वरून असे दिसते की ती एका विवाहित स्त्रीची भूमिका साकारणार आहे.

रिंकू ने 'सैराट' (sairat)चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर जबरदस्त कमाई केली होती.रिंकूचा ‘झिम्मा २’ चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

या चित्रपटात तानिया नावाचं हे पात्र रिंकू साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे. या चित्रपटात सुचित्रा बांदेकर, सुहास जोशी,सायली संजीव ,निर्मिती सावंत ,सिद्धार्थ चांदेकर,शिवानी सुर्वे यांच्या सोबत रिंकू राजगुरू दिसणार आहे.

रिंकू नये मराठी बरोबरच हिंदी चित्रपटात देखील आपला ठसा उमटवला आहे. झुंड या चित्रपटात अभिताभ बच्चन(Abhitab Bachan)यांच्यासोबत रिंकू झळकली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनीच केलं होतं. ‘२०० हल्ला हो’ आणि ‘हंड्रेड’ या वेबसीरिज मध्ये देखील रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.