रविवारी कोलकत्ता येथे भारत विरुद्ध श्रीलंका मॅच झाली होती या मॅचमध्ये भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला. एकीकडे भारत विजय उत्सव साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला एका घोड्याचा मृत्यू झाला.
क्रिकेट वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका मॅच भारताने जिंकल्यावर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी म्हणून फटाके फोडण्यात आले. कोलकत्ता येथील ईडन गार्डन्स मैदानाबाहेर फटाके फोडल्यामुळे व्हाईस ऑफ रीजन नावाच्या कोलकत्ता माउंटेन पोलीस घोड्याचा मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाक्यांचा आवाज ऐकून घोडा बिथरला आणि प्लासी रोडच्या बाजूने फास्ट निघाला जाताना दोन-तीन वाहनांना धडक बसली या धडकेमुळे ते रस्त्यावर कोसळले आहे.