Sambhajinagar Accident Maharashtra News: दिवाळीच्या उत्साहानंतर सून बनलेली मुलगी भावाच्या घरी म्हणजे माहेरला येते. त्यामुळे दिवाळीनंतर बहिणीला भाऊबीजसाठी आणायला गेलेल्या भावाचा अपघात होऊन मृत्यू झाला. त्यामुळे भाऊबीजच्या दिवशीच भाऊ गमावल्याचे दु:ख बहिणीवर ओढवले आहे.
भाऊबीज (Bhaubeej) असल्याने बहिणीला घेऊन जाऊ म्हणून केशव भिसे हा बहिणीच्या घरी येत होता. मात्र भाऊबिजेच्या दिवशी भावाला हिरवल्याचे दुःख अपघाताने बहिणीवर ओढवले आहे. भाऊरायासोबतची त्या बहिणीची ही अखेरची भाऊबीज ठरली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण रोडवरील कांचनवाडी परिसरात हा अपघात झाला. संभाजीनगर येथील कांचनवाडी परिसरात राहणाऱ्या बहिणीला भाऊबीजेसाठी घेऊन येण्यासाठी जात असताना केशव विठ्ठल भिसे (वय 23) आणि सुरेश परदेशी गुरुजी (वय 75, रा. बालम टाकळी) यांचा अपघाती मृत्यू झाला. टँकर व दोन दुचाकींचा अपघात झाल्याने दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.